आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषक:अमेरिका संघातही एक मेसी; 22 वर्षीय आराेनसनचा सर्वाधिक वेळेपर्यंत सराव

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका हा यंदा कतारमध्ये आयाेजित फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील सर्वात युवा संघ मानला जाताे. या संघाच्या वयाची सरासरी ही २४.७ वर्षे अशी आहे. हीच युवा ब्रिगेड यंदाच्या विश्वचषकामध्ये अमेरिकन संघाला घवघवीत यश संपादन करून देण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. त्यामुळे हेच युवा खेळाडू निश्चितपणे अमेरिका संघासाठी हुकमी एक्के ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये खासकरून ब्रँडन आराेनसनची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. त्याला अमेरिकन टीममधील मेसी मानले जाते. ताेही सर्वात उशिरापर्यंत कसून सराव करताना दिसताे. याशिवाय त्याची खेळण्याची शैली ही पूर्णपणे मैदानावर मेसीच्या आठवणींना उजाळा करून देणारी आहे. त्यामुळेच त्याला अमेरिकन टीममधील मेसी म्हटले जाते. चाहत्यांनी त्याचे ‘मेडफाेर्ड मेसी’ असे टाेपणनाव ठेवले आहे. कारण, त्याचा जन्म हा न्यूजर्सी येथील मेडफाेर्ड येथे झालेला आहे. अटॅकिंग मिडफील्डरची त्याची भूमिका ही लक्षवेधी ठरते.

बातम्या आणखी आहेत...