आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूझीलंडचा वेगवान गाेलंदाज ट्रेंट बाेल्ट सध्या सुरू असलेल्या १६ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये चर्चेत आहे. ताे सुरुवातीच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांसाठी अडचणीचा ठरत आहे. पहिल्या षटकात विकेट घेण्यात तरबेज असलेल्या बाेल्टने पॉवरप्लेमधील आपले वर्चस्व अबाधित ठेवले. त्यामुळे त्याने ३ वर्षांत सुरुवातीच्या षटकांत विक्रमी ३३ विकेट घेतल्या आहे.
पाॅवरप्लेमधील टॉप विकेटटेकर*: नव्या चेंडूवर गाेलंदाज बाेल्ट ठरताेय गेमचेंजर गाेलंदाज विकेट सरासरी इकाॅनॉमी बोल्ट 33 22.69 6.74 शमी 23 30.08 6.71 दीपक चहर 17 36.64 7.88 अर्शदीप 16 24.25 7.46 सिराज 16 38.31 8.06 रबाडा 16 32.68 7.80 बुमराह 15 25.73 6.65 नोर्किया 15 25.26 7.43 (*डेटा १ जानेवारी २०२० पासून)
टी-२० लीगमध्ये चार वेळा डावात पहिल्याच षटकात घेतले बाेल्टने बळी {बाेल्टने एक वेळा मुंबई आणि दाेन वेळा राजस्थान संघाकडून डावातील पहिल्या षटकात २ गडी बाद केले. {त्याने २०२० मध्ये मुंबई संघाकडून दिल्लीच्या पृथ्वी शाॅ आणि अजिंक्य रहाणे, २०२२ मध्ये राजस्थानकडून लखनऊच्या राहुल व कृष्णप्पाची विकेट घेतली. {बाेल्टने गतवर्षी बिग बॅशमध्ये मेलबर्न संघाकडून सिडनी थंडरच्या मॅथ्यू गिल्केस व राेसाेऊला पहिल्याच षटकात बाद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.