आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषक:गटातील सामन्यांदरम्यान विक्रमी 563 मिनिटांचा स्टाॅपेज टाइम

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

-वर्ल्ड फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या गटातील सामन्यांदरम्यान विक्रमी ५६३ मिनिटांचा म्हणजे नऊ तासांचा स्टाॅपेज टाइम जाेडण्यात आला. दुखापत हेच फॅक्टर ठरले. इराणच्या गाेलरक्षक एलिरेजाला इंग्लंंडविरुद्ध सामन्यादरम्यान कन्कशन केले हाेते. साैदी अरेबियाचा डिफेंडर अर्जेंटिनाविरुद्ध सामन्यादरम्यान गाेलरक्षकाला धडकला हाेता.

{इंग्लंड-इराण सामना ११७ मिनिटांचा रंगला. ही वर्ल्डकप ग्रुप स्टेजमधील मॅरेथाॅन लढत ठरली. या सामन्यांत २७ मिनिटांचा एक्स्ट्रा टाइम हाेता. {स्पर्धेतील सुुरुवातीच्या आठपैकी एक सामना फक्त १०० मिनिटांत पूर्ण हाेऊ शकला.

कारण : फिफाच्या नव्या नियमानुसार प्रत्येक हाफनंतर ‘अॅडिशनल लाॅस्ट टाइम’ जाेडण्यात आला. कतारमध्ये गाेल सेलिब्रेशन, टाइम वेस्टिंग, इंज्युरी, व्हीएआरचे निर्णय, बदली खेळाडू, पेनल्टी, रेड कार्डवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. यासाठी तज्ञ सखाेल परिक्षण करत आहेत. यामुळे वेळेत वाढ हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...