आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:जिल्ह्यातील क्रीडासाठी विशेष एक दिवस देणार : क्रीडामंत्री

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयी-सुविधा, समस्या सोडवण्यासाठी क्रीडासाठी विशेष एक दिवस देणार आहे. त्या वेळी खेळाडू, क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा, क्रीडा संकुलांची पाहणी केली जाईल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला लवकरच पूर्णवेळ क्रीडा उपसंचालक देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गुलमोहर कॉलनी येथे राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून गुलमोहर काॅलनी येथे ६० लाख रुपये खर्च करून बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी महाजन शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.

विभागीय क्रीडा संकुलास १०० कोटी रुपये द्या छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची क्रीडा राजधानी आहे. येथील विभागीय क्रीडा संकुलाची बिकट अवस्था झाली आहे. येथील काही नियोजित खेळांची मैदाने तयार झाली नाहीत. नागपूरप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासाठी १०० कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी या वेळी भाजपचे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी क्रीडामंत्र्यांकडे यावेळी केली.