आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंडे पॉझिटिव्ह:कोल्हापूर, विदर्भ, महाराष्ट्रातून खेळाडूंची तयार होईल टीम;संघटनांच्या वादाला खो, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा एकच संघ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक

एकाच खेळाच्या विविध संघटनांमधील वादाचा समूळ नायनाट करण्यासाठी अाता अखिल भारतीय खाे-खाे महासंघाच्या वतीने सकारात्मक निर्णय घेण्यात अाला. खाे-खाे महासंघाने एक राज्य, एक संघटना ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच अाता महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशमधील राज्य संघटनांचा वाद अाता संपुष्टात अाला. या दाेन्ही राज्यांमध्ये अाता एकच संघटना सक्रिय असेल. खाे-खाेला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी महासंघाने या अंतर्गत वादाला दूर केले अाहे. महासंघाची नुकतीच बैठक अायाेजित करण्यात अाली. बैठकीत एक राज्य, एक संघटना, चेअरमनपद संपुष्टात अाणि अाजीवन सदस्याचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात अाले.

तिसरे फेडरेशन ठरले

संघटना-संघटनांमधील वादाचा नायनाट करण्यासाठी अाता प्रत्यक्षात केंद्र सरकारने लक्ष घातले अाहे. यासाठी केंद्र सरकारने भारतीय अाॅलिम्पिक संघटनेला साेबत घेऊन देशभरात ‘एक राज्य, एक युनिट’ ही माेहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतला. २०११ च्या स्पाेर्ट््स काेडनुसार ही माेहीम अाता अधिक सक्रिय झाली. यातून ही नियमावली लागू करण्यासाठी अातापर्यंत देशातील तीन फेडरेशनने पुढाकार घेतला. यात टेनिस, हाॅकी अाणि खाे-खाेचा समावेश अाहे.

अाता महाराष्ट्र, मध्य प्रदेशाची प्रत्येकी १ टीम

महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेश राज्यातून दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्वतंत्र असे पाच संघ सहभागी हाेतात. यामध्ये महाराष्ट्रातील तीन अाणि मध्य प्रदेशच्या दाेन संघांचा समावेश अाहे. महाराष्ट्रातून विदर्भ, काेल्हापूर अाणि महाराष्ट्र अशी स्वतंत्र प्रत्येकी एक टीम निवडली जात हाेती. मात्र, या तिन्ही मिळून एकच संघ अाता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाईल. तसेच मध्य प्रदेशमध्ये मध्य भारत अाणि मध्य प्रदेश हे दाेन संघ सहभागी व्हायचे. अाता यांचाही एकच संघ सहभागी हाेणार अाहे.

वाद संपुष्टात अाल्याने प्रगती वेगात : त्यागी

राज्यांमधील संघटनांत माेठ्या संख्येत वाद अाहेत. याच वादामुळे खेळाच्या विकासाला चालना मिळत नसल्याचे दिसून येते. याशिवाय खेळाडूंचेही माेठे नुकसान हाेते. हाच प्रकार टाळण्यासाठी अाम्ही अाता ही नियमावली देशभर राबवण्याचा निर्णय घेतला अाहे. याचा निश्चित फायदा खेळाडू अाणि संघटनांना हाेईल. वाद संपुष्टात अाल्याने प्रगती हाेईल. महेंद्रसिंग त्यागी, सचिव, अखिल भारतीय खाे-खाे महासंघ, नवी दिल्ली.