आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • A Trial Flap In As Many As 11 Months; Team Announced For World Cup, Chahar Ignored; Pick Of Bumrah, Hershal

दिव्य मराठी ॲनालिसिस:तब्बल 11 महिन्यांमधील प्रयाेग फ्लाॅप; वर्ल्डकपसाठी संघ जाहीर, चहरकडे दुर्लक्ष; बुमराह, हर्षलची निवड

चंद्रेश नारायणन | मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा ऑस्ट्रेलियात हाेणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी साेमवारी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात आली. राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या विश्वचषकात आपले नशीब आजमावणार आहे. निवड समितीने जाहीर केलेल्या संघात काेणत्याही प्रकारचा धक्कादायक वा आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला नाही. याच विश्वचषकासाठी संघ निवड करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तब्बल ११ महिने वेगवेगळे प्रयाेग साकारले. मात्र, यातून बीसीसीआयच्या समाधानकारक असे काहीही हाती लागले नाही. याच प्रयाेगाकडे दुर्लक्ष करून आता निवड समितीने संघ जाहीर केला.

ईशान व सॅमसनसाठी दाेन वर्षे वेट अँड वाॅच संजू सॅमसन व ईशान किशनसारख्या युवा खेळाडूंची सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती. मात्र, त्यांना यातून मेजर स्पर्धेसाठी संधी मिळाली नाही. त्यांच्या याच कामगिरीकडे निवड समितीने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संजू सॅमसन आणि ईशानला विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न साकारण्यासाठी दाेन वर्षे वेट अँड वाॅच करावे लागणार आहे. कारण २०२४ मध्ये टी-२० फाॅरमॅटचा विश्वचषक हाेणार आहे.

अश्विनला पसंती; रवीला विश्रांती दीपक चहरची सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरली हाेती. त्यामुळे त्याचा विश्वचषकासाठी भारतीय संघातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात हाेता. मात्र, त्याच्याकडे निवड समितीने पाठ फिरवली. त्यामुळे त्याला दिलेली विश्रांती हा सध्या चर्चेचा मुद्दा ठरला आहे. युवा गाेलंदाज रवी बिश्नाेईही यासाठी प्रबळ दावेदार मानला जात हाेता. त्याच्याकडेही निवड समितीने दुर्लक्ष केले. समितीने अश्विनच्या फिरकीवर अधिक विश्वास दर्शवला.

शमी राखीव गटात : शमीला आता राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. त्याच्या या बाबतीतील निर्णयही काहीसा चर्चेचा आहे. त्याची सत्रातील माेठ्या स्पर्धेसाठी संघात निवड झाली नाही. मात्र, तरीही आता त्याला राखीवच्या यादीत संधी देण्यात आली. त्याने आपला शेवटचा टी-२० सामना गत वर्षी विश्वचषकात खेळला हाेता.

टी-20 वर्ल्डकप : भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक, अश्विन, चहल, अक्षर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, हर्षल पटेल, अर्शदीप. राखीव : शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ रोहित (कर्णधार), राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार, दीपक, ऋषभ कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक, अश्विन, चहल, अक्षर, भुवनेश्वर, शमी, हर्षल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

द. आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ रोहित (कर्णधार), राहुल (उपकर्णधार), कोहली, सूर्यकुमार, दीपक हुडा, ऋषभ, कार्तिक (यष्टिरक्षक), अश्विन, चहल, अक्षर, अर्शदीप, शमी, हर्षल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

बातम्या आणखी आहेत...