आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रियन मोटोजीपी:मोटोजीपीत 320 किमी/ प्रती तासाच्या वेगात अपघात; राेसी वाचला

स्टिरियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाेहान जर्काे व फ्रेंकाे यांच्या बाइकची धडक

ऑस्ट्रियन मोटोजीपी रेसच्या दरम्यान भीषण अपघात झाला. मात्र, यात काेणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या रेसमध्ये फ्रेंको मॉर्बिडेली आणि जोहान जर्को यांच्या बाइक समाेरासमाेर धडकल्या. ३२० किमी/प्रती तासाच्या वेगाने त्या एकमेकींना भिडल्या. दाेन्ही बाइक हवेत फेकल्या गेल्या. याच दरम्यान रेसमध्ये सहभागी झालेल्या इटलीचा रेसर राेसीच्या बाइकसमाेर दुसरी गाडी येऊन धडकणार हाेती. मात्र, त्याने वेळीच समयसूचकता दाखवून हा अपघात टाळला. त्यामुळे ताे यादरम्यान हाेणारा माेठ्या अपघातामधून वाचला.

> भीषण अपघातानंतर तत्काळ फ्रेंको मॉर्बिडेली-जोहान जर्को यांना ट्रॅकच्या बाजूला वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. तज्ञ डाॅक्टरांचे पथक वेळेत दाखल झाले.

> मॉर्बिडेलीच्या भरधाव घासत येत असलेल्या बाइकने जीवच घेतला असता. बाइक वेगाने येत हाेती, असे राेसी म्हणाला. ताे रेसमध्ये पाचव्या स्थानी राहिला.

बातम्या आणखी आहेत...