आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Aditi Swamy Debut Champion, Golden Chaikar Of Expectation, Dayala Second Gold; Churas In Maharashtra Haryana For Number One In Play India Youth Games

खेलो इंडिया यूथ गेम्स:अदिती स्वामी पदार्पणात चॅम्पियन, अपेक्षाचा गोल्डन चौकार, दियाला दुसरे सुवर्ण; नंबर वनसाठी महाराष्ट्र-हरियाणात चुरस

पंचकुला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वेळचा विजेता महाराष्ट्र संघ खेलो इंडिया यूथ गेम्सच्या चॅम्पियनशिपसह नंबर वनच्या हॅट््ट्रिकसाठी सज्ज झाला आहे. जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिसने दाेन, तिरंदाज अदिती स्वामी, टेबल टेनिसपटू दिया चितळे आणि मल्लखांबपटू ऋषभ घुबाडेने प्रत्येकी एक सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यासह महाराष्ट्राच्या नावे आता ४० सुवर्णपदकांची नाेेंद झाली. त्यामुळे ४० सुवर्णांसह एकूण १०४ पदकांसह महाराष्ट्र संघाने पदकतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले. यजमान हरियाणा संघ ११५ पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. साेमवारी चाैथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्सचा समाराेप हाेणार आहे. त्यामुळे खाे-खाेसह बाॅक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची कमाई करत महाराष्ट्र संघ आपली हॅट््ट्रिक साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. हरियाणाचे शक्तिस्थान समजल्या जाणाऱ्या बॉक्सिंगमध्येच महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. महाराष्ट्राचे चार बॉक्सर गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत.

दिवसभरात गोल्डन पंच : रविवारी दिवसभरात महाराष्ट्राने गोल्डन पंच मारला. संघाने पाच सुवर्णपदके जिंकली. २ रौप्य आणि ५ कांस्यपदके मिळाली. बॉक्सिंगमध्ये पाच कांस्यपदके आली.

अदितीला सुवर्ण, नगरच्या पार्थ काेरडेला राैप्यपदक
साताऱ्याच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाज अदिती स्वामीने पदार्पणात खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. तिने महिलांच्या कंपाउंड राउंडमध्ये सुवर्णपदकाचे लक्ष्य अचूकपणे भेदले. तिने पंजाबच्या अवनीत कौर हिचा पराभव केला. अदितीचा स्कोअर १४४ होता, तर अवनीत १३७ गुणांवर होती. प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे साेनेरी यश संपादन केले. तसेच अहमदनगरचा पार्थ कोरडे राैप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याचे एका गुणाने सुवर्णपदक हुकले. पार्थ व आंध्र प्रदेशच्या व्यंकी यांच्यात फायनल झाली.

अपेक्षाची सुवर्णभरारी कायम
जलतरणात अपेक्षा फर्नांडिसमुळे महाराष्ट्राची खरोखरच नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने आजही पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला. आज दोन सुवर्णपदके मिळवून दिली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर २०० मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्णपदक उंचावले. त्यात २.१८.३९ सेकंदांची वेळ नोंदवून इंडियातील बेस्ट टायमिंग दिला. ४ बाय १०० फ्रीस्टाइल रिलेमध्ये सायंकाळी उशिरा एक रौप्यपदक आले. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.

गोल्डन पंचसाठीची लढाई
बॉक्सिंगमध्ये व्हिक्टर सिंग (पुणे) हा चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढेल. सुरेश विश्वनाथची फाइट हरियाणाच्या आशिषसोबत आहे. विजयसिंग आकाश कुंदीरसोबत, तर कुणालचा हरियाणाच्याच दीपकसोबत सामना होईल.

टेटेमध्येही सुवर्ण
टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत मुंबईच्या दिया चितळेने पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने दिल्लीच्या लतिकाचा पराभव केला. सोमवारी दिल्लीच्याच आदर्श क्षेत्रीसोबत महाराष्ट्राच्या दीपितचा कांस्यपदकासाठी सामना होणार आहे.

खाे-खाे : डबल गोल्डन धमाक्याची संधी; आज आेडिशाविरुद्ध फायनल
खाे-खाेमध्ये महाराष्ट्र संघाला डबल गोल्डन धमाका उडवण्याची साेमवारी संधी आहे. रामजी व जान्हवीच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने आपापल्या गटाच्या फायनलमध्ये धडक मारली. महिला संघाने उपांत्य सामन्यात पश्चिम बंगालचा पराभव केला. आता टीमसमाेर आेडिशाचे आव्हान असेल. तसेच पुुरुष संघाने दिल्लीचा पराभव केला. आता टीमचा सामना आेडिशाशी हाेईल.

बातम्या आणखी आहेत...