आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:आदित्यची सुवर्ण हॅट्ट्रिक; एमपीपीला 13 पदके

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जलतरणिकेत आयोजित स्विम मराठवाडा जलतरण स्पर्धेत एमपीपी स्पोर्ट््स क्लबच्या खेळाडूंनी एकूण १३ पदके पटकावली. यात ८ वर्षीय आदित्य दुबेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची हॅट््ट्रिक साधली आणि १ रौप्यपदकासह एकूण ४ पदके आपल्या नावे केली. स्पर्धेत विविध वयोगटात एकूण ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक सागर बडवे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे अॅड. गोपाल पांडे, विनायक पांडे, अॅड. संकर्षण जोशी, डॉ. मकरंद जोशी, राजीव बडवे, कांचन बडवे, प्रभाकर शिंदे यांनी अभिनंदन केले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : ८ वर्षाखालील गट - कैवल्य बोर्डे (१ सुवर्ण व ३ रौप्य). १० वर्षे गट - ओंकार दळवी (१ कांस्य). १४ वर्षे गट - पूर्वा दळवी (१ रौप्य). १७ वर्षे गट - प्रणव मिटकरी (१ सुवर्ण), हरीश सांगळे (१ रौप्य आणि १ कांस्यपदक).

बातम्या आणखी आहेत...