आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pak Vs Afg Asia Cup 2022| Pakistan Beat Afghanistan By 1 Wickets At Sharjah

आशिया चषक:थरारक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय, भारताची अंतिम फेरीची आशा संपली

शारजाहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतील महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 129 धावा केल्या. इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 35 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर 9 गडी गमावून 131 धावा केल्या.

शादाब खानने 36, इफ्तिखार अहमदने 30 आणि मोहम्मद रिझवानने 20 धावा केल्या. नसीम शाह चार चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिला. गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून फझहलक फारुकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. याशिवाय राशिद खाननेही दोन विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजाना फार काही मोठी मजल मारता आली नव्हती. आक्रमक सलामीनंतर अफगाणिस्तानचा डाव अडखळला होता. मोहम्मद नवाझ आणि शादाब खान यांच्या फिरकीने अफगाणिस्तानला रोखले.

शेवटचा थरार
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने शेवटच्या षटकात लागोपाठ दोन षटकार मारून संपूर्ण सामनाच फिरवला. पाकिस्तानला विजयासाठी सहा चेंडूत 11 धावांची गरज होती. त्याने फझहलहक फारुकीच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला आणि सामना संपवला.

या विजयासह भारताचे आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. आता टीम इंडिया गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध फक्त औपचारिक सामना खेळणार आहे. यासह आशिया चषकाचा अंतिम सामना आता 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...