आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील क्षेत्रीने रोनाल्डोसारखी मारली फ्री किक:भारताने अफगाणिस्तानचा केला 2-1 असा पराभव, समदने केला विजयी गोल

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय फुटबॉल संघाने शनिवारी रात्री AFC आशियाई चषक पात्रता-2023 मध्ये अफगाणिस्तानवर 2-1 असा रोमांचक विजय नोंदवला. त्याचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. आता हा संघ 14 जूनला हाँगकाँगशी भिडणार आहे.

कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर तब्बल सहा महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या भारताचे माजी कर्णधार सुनील क्षेत्री आणि साहेल समद यांनी शानदार कामगिरी करत भारतीय फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली.

येथे भारताचा कर्णधार सुनील क्षेत्री याने घरच्या प्रेक्षकांमध्ये ही फ्री किकवर अप्रतिम गोल केला. हा गोल 86व्या मिनिटाला झाला. या गोलमुळे भारतीय संघाने सामन्याच्या शेवटच्या हाफमध्ये 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पण, भारतीय संघाचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण बरोब्बर दोन मिनिटांनंतर झुबेर अमीरीने 88व्या मिनिटाला पाहुण्या संघासाठी गोल करत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला.

अशा स्थितीत हा खेळ एक्स्ट्रा टाइम मध्ये जाणार असे सर्वांना वाटत होते. पण, अब्देल समद साहेलने वेळेत गोल करत भारताला 2-1 असा विजय मिळवून दिला. हा गोल 90+1 मिनिटात झाला.

विजयी गोल केल्यानंतर अब्दुल समद.
विजयी गोल केल्यानंतर अब्दुल समद.

‘ड’ गटात टीम इंडिया आहे दुसऱ्या क्रमांकावर

या विजयासह भारतीय संघ स्पर्धेतील ‘ ड ‘गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. हाँगकाँगचा संघ पहिल्या स्थानावर आहे. दोघांच्या खात्यात समान 6-6 गुण आहेत. मात्र, गोल फरकाच्या बाबतीत हाँगकाँगचा संघ पुढे आहे.

कंबोडियाच्या विरुद्ध जिंकला होता पहिला सामना

कंबोडियावर 2-0 असा विजय मिळवून भारतीय संघाने प्रवासाला सुरुवात केली. 8 जून रोजी झालेल्या या सामन्यात कर्णधार सुनील क्षेत्रीने दुहेरी गोल केले. एक गोल पेनल्टीवर तर दुसरा मैदानी गोल होता.

बातम्या आणखी आहेत...