आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर डेव्हिड मिलर (६४) आणि वान डेर डुस्सेनने (७५) अभेद्य शतकी भागीदारीतून दक्षिण आफ्रिका संघाला गुुुरुवारी यजमान टीम इंडियाविरुद्ध सलामी टी-२० सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. पाहुण्या आफ्रिका संघाने १९.२ षटकांत ७ गड्यांनी सामना केला. यासह आफ्रिका संघाने टीम इंडियाच्या सलग टी-२० मध्ये १३ व्या विजयाच्या माेहिमेला रोखले. त्यामुळे सलग १२ विजयांनंतर भारताचा १३ व्या सामन्यात पराभव झाला.
या विजयाने आफ्रिकेने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. रविवारी दुसरा सामना कटक येथे रंगणार आहे.
कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २११ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.
अभेद्य १३० धावांची भागीदारी : दक्षिण आफ्रिका संघाच्या विजयासाठी वान डेर डुस्सेन आणि डेव्हिड मिलरने झंझावाती अभेद्य १३० धावांची भागीदारी रचली. यासह आफ्रिका संघाला शानदार विजय संपादन करता आला. यादरम्यान डुस्सेन व डेव्हिड मिलरने वैयक्तिक अर्धशतकेही साजरी केली.
भारताची विक्रमी धावसंख्या :
यजमान भारतीय संघाने टी-२० सामन्यात गुरुवारी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभी केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना चार गड्यांच्या माेबदल्यात २११ धावा काढल्या. यापूर्वी ५ बाद २०३ धावसंख्या नाेंद हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.