आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Africa's Keegan Pietersen Will Miss The Upcoming Australia Tour Due To Injury

सीएसए टी-20 चॅलेंज स्‍पर्धा:दुखापतीमुळे आफ्रिकेचा किगन पीटरसन आगामी ऑस्ट्रेलिया दाैऱ्याला मुकणार

जाेहान्सबर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिका संघ पुढच्या महिन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे. यासाठी आफ्रिका संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दाैरा करणार आहे. या दाैऱ्यावर यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसाेटी मालिका खेळणार आहे. द.आफ्रिका संघाचा किगन पीटरसन हा दाैऱ्याला मुकणार आहे. त्याला नुकतीच सीएसए टी-२० चॅलेंज स्पर्धेच्या फायनलदरम्यान गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला आता सहा ते आठ आठवड्यांची दीर्घ विश्रांती घ्यावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दाैऱ्यासाठी पुढच्या आठवड्यात द. आफ्रिका संघ जाहीर हाेणार आहे. २०२१ मध्ये पदार्पण करणाऱ्या पीटरसनला आता दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर व्हावे लागत आहे. याशिवाय केशव महाराज ही या दाैऱ्यावर जाणार नसल्याची चर्चा आहे. त्याला टी-२० मालिकेत हाॅलंड संघाविरुद्ध सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली.

बातम्या आणखी आहेत...