आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Afridi's Four Wickets Take Pakistan Into The Final Four; Now New Zealand's Challenge

टी-20 वर्ल्डकप:आफ्रिदीच्या चार विकेटने पाकची अंतिम चारमध्ये धडक; आता न्यूझीलंडचे आव्हान

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर शाहिन आफ्रिदीच्या (४/२२) शानदार कामगिरीतून पाकिस्तान संघाला वर्ल्डकपच्या अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित करता आला. पाकने करा वा मरा सामन्यात पहाटेच बांगलादेश संघाला धूळ चारली. पाकने पाच गड्यांनी सामना जिंकला. बांगलदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२७ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पाकने १८.१ षटकांत ५ गडी राखून सामना जिंकला. संघाच्या विजयामध्ये सलामीवीर रिझवान (३२), कर्णधार बाबर आझम (२५), हॅरीस (३१) आणि शान मसुदने (नाबाद २४) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे पाकला विजय मिळवता आला. आता पाकला बुधवारी उपांत्य फेरीत तगड्या न्यूझीलंड टीमच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...