आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After 1446 Days, Team India Lost At Home; The Next Three Tests Must Be Won

टीम इंडियाचा चेन्नईत पराभव:1446 दिवसांनंतर टीम इंडियाचा घरच्या मैदानावर झाला पराभव; पुढील तिन्ही कसोटींत विजय आवश्यक

चेन्नई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षकांना मिळणार प्रवेश; नवा निर्णय जाहीर

पाहुण्या इंग्लंड संघाने जॅक लिंच (४/७६) अाणि जेम्स अँडरसन (३/१७) यांनी भेदक माऱ्याच्या बळावर मंगळवारी सलामीच्या कसाेटी सामन्यात यजमान टीम इंडियाला धूळ चारली. खडतर ४२० धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाचा ५८.१ षटकांत अवघ्या १९२ धावांत खुर्दा उडाला. इंग्लंड संघाने २२७ धावांनी पहिली कसाेटी जिंकली. भारताकडून विराट काेहली (७२) अाणि शुभमान गिल (५०) यांनी दिलेली एकाकी झंुज अपुरी ठरली. त्यामुळे टीमला हे माेठे लक्ष्य गाठता अाले नाही.

अाता वर्ल्ड कसाेटी चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतील अापले अाव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला मालिकेतील अागामी तिन्ही सामन्यांत विजय अावश्यक अाहे. यातील एकाही पराभवाने टीमला ही फायनल गाठता येणार नाही. मालिकेतील दुसऱ्या कसाेटीला १३ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या याच मैदानावर सुरुवात हाेईल.

विजयी सलामीसह ज्याे रुटच्या कुशल नेतृत्वात इंग्लंड संघाने चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अापल्या शतकी कसाेटीत द्विशतक साजरे करणारा ज्याे रुट सामनावीरचा मानकरी ठरला. अाशियाई मैदानावरचे सर्वाेच्च लक्ष्य मानल्या जाणाऱ्या ४२० धावांच्या प्रत्युत्तरात टीमने कालच्या १ बाद ३९ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९२ धावांत खुर्दा उडाला.

प्रेक्षकांना मिळणार प्रवेश; नवा निर्णय जाहीर

दुसऱ्या कसाेटीला शनिवारपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात हाेईल. या कसाेटीदरम्यान प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार अाहे. यासाठीच्या निर्णयावर अायाेजक अाणि राज्य शासनाचे एकमत झाले. त्यामुळे अाता येथील प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून या कसाेटीचा अानंद लुटता येईल.

काेहलीचे नेतृत्व अपयशी; तीन कसाेटीत पराभव

कर्णधार काेहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा हा सलग चाैथा पराभव ठरला. टीमने यापूर्वी अाॅस्ट्रेलियात अॅडिलेड कसाेटी, न्यूझीलंडमध्ये दाेन कसाेटीत पराभव पत्कारला हाेता.

कर्णधार रुटच्या नेतृत्वात इंग्लंडची माेहीम फत्ते

कर्णधार ज्याे रुटच्या कुशल नेतृत्वात इंग्लंडच्या संघाला भारत दाैऱ्यात अापली विजयाची माेहीम फत्ते करता अाली. यातून रुटच्या नेतृत्वात इंग्लंडचा भारत दाैऱ्यात अद्याप एकदाही पराभव झाला नाही.

२०१६ मध्ये चेन्नईत अँडरसन हाेता बाहेर

जेम्स अँडरसनने दुसऱ्या डावात उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने अाता तीन विकेट घेतल्या. २०१६ मध्ये चेन्नईत झालेल्या शेवटच्या कसाेटी सामन्यात त्याला विश्रांती देण्यात अाली हाेती. त्याला सुमार खेळीने बाहेर बसावे लागले हाेते. मात्र, त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन करत ३६ कसाेटीत १४४ बळी घेतले.

भारतीय संघाचा सलामीच्या कसाेटी सामन्यातील पराभव हा भारतीय संघाच्या डाेळ्यात झणझणीत अंजन घालणारा अाहे. याशिवाय याच पराभवाने अाता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीलाही सखाेल पद्धतीने विचार करावा लागणार अाहे. कारण, अागामी कसाेटीसाठी संघ निवड करताना चर्चा हाेण्याची गरज असल्याची अाताा या पराभवातून सहज स्पष्ट झाले. अाता अशा प्रकारचे लाजिरवाणे पराभव टाळण्यासाठी निवड समितीने दर्जेदार खेळाडूंना संघात स्थान देण्याची गरज असल्याचे दिसते. श्रीलंकेविरुद्ध कसाेटी मालिका विजयाची माेहीम फत्ते करून अालेला इंग्लंड संघ फाॅर्मात अाहे. टीमच्या प्रत्येक खेळाडूमधील अात्मविश्वास द्विगुिणत झालेला अाहे. याचाच फायदा टीमला अाता झाला. टीम इंडियाला दुबळ्या गाेलंदाजी व त्यानंतर अपयशी ठरलेल्या फलंदाजीचा माेठा फटका बसला. अाता हेच अपयश दूर सारण्यासाठी निवड समितीचा चर्चात्मक निर्णय संघाला तारणारा ठरेल.

अँडरसनचे भारताविरुद्ध सर्वाधिक बळी : इंग्लंडचा वेगवान गाेलंदाज जेम्स अँडरसन हा भारताविरुद्ध सर्वात यशस्वी गाेलंदाज ठरला. त्याने अाता सलामी कसाेटीत तीन विकेट घेतल्या. यासह त्याच्या नावे अाता भारताविरुद्ध सर्वाधिक ११५ बळींची नाेंद झाली. त्याने २८ सामन्यांत हा पराक्रम गाजवला.
इंग्लंड संघाला अाशियाई मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवता अाला. इंग्लंडने अाता सलामीची कसाेटी जिंकून अापल्या नावे अाशियातील मैदानावरचा ३० वा विजय नाेंद केला. यासह अाशियाई मैदानावर सर्वाधिक विजय संपादन करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. अातापर्यंत अाॅस्ट्रेलिया २८ विजयासह दुसऱ्या स्थानावर अाहे. त्यापाठाेपाठ तिसऱ्या स्थानी असलेल्या विंडीजच्या नावे २६ विजय अाहेत. तसेच भारताने दहा वर्षे व चार कसाेटी सामन्यांनंतर पराभवाची चव चाखली अाहे.