आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा(शेखर झा)
लॉकडाऊनमुळे दीड महिन्यापासून खेळाडू सरावापासून दूर आहेत. अशात पुन्हा लय मिळवण्यासाठी जवळपास ६ महिने लागतील, असे आंतरराष्ट्रीय धावपटू दुती चंदने म्हटले. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती स्पष्ट नाही. अधिक माहितीनंतरच ती ऑलिम्पिकची तयारी करेल. कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक एका वर्षासाठी स्थगित केले आहे. आता स्पर्धा २०२१ जुलै-ऑगस्टमध्ये होईल. दुती पात्रता स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत ऑलिम्पिक तिकीट मिळवण्यासाठी उतरेल. ती २०१६ रियो ऑलिम्पिकमध्येदेखील उतरली होती. त्या वेळी ती चांगले प्रदर्शन करू शकली नाही.
दुतीने म्हटले की, १०० आणि २०० मीटर शर्यतीवर सरकारचे लक्ष्य नाही. लांबपल्ल्याच्या शर्यतीत अनेक धावपटू मिळतील, मात्र स्प्रिंटमध्ये कमी खेळाडू आहेत. ऑलिम्पिकची पात्रता मिळवेल अशी अशा आहे. २०१८ एशियन स्पर्धेत दुतीने १०० व २०० मीटरमध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. त्यासह २०१९ मध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने २०० मीटर शर्यतीचे कांस्य जिंकले होते. जागतिक अॅथलेटिक्स फेडरेशनने ३० नोव्हेंबरपर्यंत ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा स्थगित केल्या आहेत. मूळ ओडिशाची रहिवासी असलेल्या दुतीने म्हटले की, पाच दिवस सराव न केल्यास तो शून्यावर येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.