आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After A Slow Start, The Indian Team Is Finishing The Match Quickly, India England Fight Two. 1.30 P.m.

दिव्य मराठी अ‍ॅनालिसिस:संथ सुरुवात केल्यानंतर वेगाने सामना संपवतोय भारतीय संघ, भारत-इंग्लंड लढत दु. 1.30 वा.

अ‍ॅडिलेड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये ५.९६ व डेथ ओव्हर्समध्ये ११.९० धावा केल्या

गुरुवारी टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅडिलेड येथे दुपारी १.३० वाजेपासून खेळवला जाईल. २०१२ नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. भारत आणि इंग्लंडचे संघ याआधी टी-२० विश्वचषकात तीनदा समोरासमोर आले, त्यापैकी दोन वेळा भारताने आणि एकदा इंग्लंडने विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी पाहिली, तर संघाची सुरुवात संथ होत असली तरी शेवटी ते वेगवान खेळ करून सामना पूर्ण करत असल्याचे दिसून येते. या स्पर्धेत भारताची सुरुवात सर्वात संथ झाली आहे.सुपर-१२ मध्ये टीमने पॉवरप्लेमध्ये प्रति षटक ५.९६ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये नेदरलँड्स, झिम्बाब्वे व पाकननंतर चौथ्या क्रमांकावर धावा केल्या. पण संघ डेथ ओव्हर्समध्ये वेगवान खेळ दाखवत आहे. शेवटच्या ४ षटकांत संघाने प्रति षटक ११.९० धावा काढल्या. नव्या चेंडूविरुद्ध संघ अत्यंत सावध पवित्रा घेतो. त्याने आपल्या ५ सामन्यांमध्ये एकदाच पहिल्या षटकात १३ धावा केल्या.

भारत व इतर संघात प्रत्येक सत्रात प्रति षटक धावा सत्र भारत सर्व संघ पॉवरप्ले (1-6) 5.96 6.79 मिडिल (7-16) 8.50 7.71 डेथ ओव्हर्स (17-20) 11.90 8.75

अ‍ॅडिलेडवर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला यश अ‍ॅडिलेडवर ६ टी-२० विश्वचषक सामन्यात पाठलाग करणारा संघ जिंकला. फिरकीपटू (प्रति षटक ७.३३ धावा), वेगवान गोलंदाज (प्रति षटक ७.६७ धावा) पेक्षा अधिक किफायतशीर आहे. वेगवान गोलंदाजांचा स्ट्राइक रेट १७.८ व फिरकीपटूंचा १९.५ राहिला.

सरावादरम्यान चेंडू लागून कोहलीला दुखापत कर्णधार रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्याही हाताला दुखापत झाली असली तरी त्याची दुखापत गंभीर नाही. दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत खेळतील. सराव सत्रादरम्यान हर्षलचा चेंडू कोहलीच्या अंगठ्याला लागला, त्यामुळे त्याला काही काळ सराव थांबवावा लागला आणि तो नेटमधून बाहेर पडला. काही वेळाने तो परतला आणि पुन्हा सरावाला लागला. कोहली उत्कृष्ट फॉर्मात अाहे. त्याने या स्पर्धेत ५ सामन्यात ३ अर्धशतकांसह २४६ काढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...