आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After Ten Years Of Hard Work, Morocco Became The Most Successful African Country

उपांत्य फेरी:दहा वर्षे मेहनतीचे यश, मोरोक्को हा सर्वात यशस्वी आफ्रिकन देश बनला

दोहा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोरोक्कोने फुटबॉल खेळणाऱ्या आफ्रिकन देशांना नव्या उंचीवर नेले आहे. फ्रान्सविरुद्ध उपांत्य फेरी खेळणारा मोरोक्कन पहिला संघ होता. पण, या सामन्यापर्यंतचा प्रवास मोरोक्कोसाठी लांब पल्ल्याचा होता. हा बदल २००९ पासून सुरू झाला. २००९ मध्ये मोरोक्कोचा जुना राजा मोहम्मद चौथा यांच्या नावावर फुटबॉल अकादमी उघडण्यात आली. पोर्तुगालविरुद्ध गोल करणारा स्ट्रायकर युसेफ एन-नेसिरी या अकादमीतून फुटबॉल शिकला. तसेच, मिडफिल्डर एझेदिन औनाही व इतर खेळाडू या अकादमीतून बाहेर पडले. अकादमीचे युरोपमधील अनेक क्लबशी करार केला, ज्याद्वारे अकादमीच्या खेळाडूंना युरोपियन क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळते.

बाजारात मोरोक्कोची जर्सी नाही, अर्ध्या दिवसात माल समाप्त ज्या वेगाने मोरोक्कन संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे, त्याच वेगाने मोरोक्कन संघाच्या जर्सीची मागणी बाजारपेठेत वाढली आहे. अनेक व्यापारी सांगतात की, ते मोरोक्को संघाच्या जर्सीची मागणी पूर्ण करु शकत नाहीत. मोहम्मद सादिक सांगतात की, ‘नोव्हेंबरमध्ये फक्त मोरोक्कोच्या निवडक जर्सी विकल्या. परंतु, प्रत्येक मोरोक्कन विजयासह जर्सीची बाजारातील मागणी वाढली. आम्ही दररोज शेकडो जर्सी ऑर्डर करायचो व अर्ध्या दिवसात त्या विकल्या.’

बातम्या आणखी आहेत...