आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After The Defeat In The Semi Finals, Bajrang Is Hoping For A Medal, The Father Said – Son Never Returned Empty Handed; News And Live Updates

वडिलांचा विश्वास कायम:बघितलं? मी सांगितलं होतं ना, तो कधी रिकाम्या हाताने परतणार नाही! बजरंग पुनियाचे वडील; मुख्यमंत्र्यांनी अडीच कोटी देण्याची केली घोषणा

पानिपतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्तेझा घियासीचा केला होता पराभव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी कांस्यपदक जिंकले आहे. फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेतील 65 किलो वजनी गटात पुनिया याने कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचा 8-0 असा पराभव केला. या विजयामुळे बजरंग पुनिया याचा सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे. तर दुसरीकडे, बजरंग यांच्या घरी उत्सव साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे सामन्यापूर्वी पुनिया याच्या वडिलांनी आपला मुलगा कांस्यपदक घेणार असून तो रिकाम्या हाताने परत नाही असा विश्वास व्यक्त केला होता. बजरंग पुनिया यांच्या या विजयाने त्यांच्या वडीलांचा विश्वास कायम राहिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
टोकियो ऑलिम्पिकमधील या विजयानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुनियासाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, पुनिया याला अडीच कोटी रोक रक्कमासह सरकारी नोकरी आणि फ्लॅटमध्ये 50 टक्के सूट दिली जाणार आहे. त्यासोबतच त्यांच्या खुड्डन गावात एक स्टेडियम उभारले जाईल असे आश्वासनदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

बजरंगचे वडील बलवान सिंह (डावीकडे) आणि इतर नातेवाईक.
बजरंगचे वडील बलवान सिंह (डावीकडे) आणि इतर नातेवाईक.

काय म्हणाले होते बजरंगचे वडील?
बजरंग पुनिया यांचे वडील म्हणाले होते की, माझा मुलगा आजपर्यंत कधीही रिकाम्या हाताने परतला नाही. त्यामुळे तो आज कांस्यपदक नक्कीच घेऊन येईल. संपूर्ण देशाची प्रार्थना त्यांच्या पाठीशी आहे. महिनाभरापूर्वी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तरीही त्याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. दुखापतीमुळे त्याला काऊंटर अॅटक करता न आल्याचे त्यांच्या वडीलाने सांगितले होते. या विजयामुळे त्यांच्या विश्वास कायम राहिला आहे.

या विजयानंतर आई झाली भावूक
बजरंग पुनियाच्या विजयाची घोषणा होताच त्याची आई ओम प्यारी भावूक झाली. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले असताना ती म्हणाली की, माझा मुलगा जो सांगतो तो करुन दाखवतो. आज त्याने माझी आणि त्याच्या वडिलांना लाज राखली. देव माझ्या मुलाला दीर्घायुष्य देवो आणि त्याला आनंदी ठेवो अशी कामना त्यांच्या आईनी यावेळी केली.

बजरंग पुनियाचे पालक विजयाचे चिन्ह दर्शवताना...
बजरंग पुनियाचे पालक विजयाचे चिन्ह दर्शवताना...

उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्तेझा घियासीचा केला होता पराभव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पैलवान बजरंग पुनिया याने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. पुनिया याने 65 किलो वजनी गटात आशियाई चॅम्पियनशिपचे कांस्यपदक विजेता इराणच्या मोर्तेझा घियासीचा पराभव केला आहे.

अझरबैजानच्या कुस्तीपटूशी बजरंग पुनियाचा संघर्ष.
अझरबैजानच्या कुस्तीपटूशी बजरंग पुनियाचा संघर्ष.

भारताला आतापर्यंत 7 पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 7 पदक पटकावले आहे. पहिले पदक वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू यांनी जिंकले. पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेन यांनी पदक मिळवले. यासह भारतीय पुरष हॉकी संघाने एक तर कुस्तीत रवि दहियाने कांस्यपदक मिळवले आहे. 2012 नंतर भारताचा सर्वात यशस्वी ऑलिम्पिक राहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...