आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After The Political Upheaval, Football Fans Are Now United In Brazil, Lula's Election As President After A Shoulder Shift

राजकीय धुळवडीनंतर आता ब्राझीलमध्ये फुटबाॅलप्रेमींची एकजूट:खांदेपालटानंतर राष्ट्रपतिपदी लुला यांची निवड

जॅक निकस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये यंदा फिफा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यांनी जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे लाखाे चाहते याच सामन्यांना पहिली पसंती दर्शवत आहेत. विश्वचषकादरम्यान दुसरीकडे ब्राझीलमध्ये खांदेपालटासाठी राेज राजकीय नेत्यांमध्ये सामना रंगताना दिसत हाेता. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीने राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली हाेती. अशा अटीतटीच्या लढतीमध्ये लुला यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये कमी मतांनी मावळत्या राष्ट्रपती बाेल्सेनाराे यांचा पराभव केला. या विजयाने आता या ठिकाणी नेतृत्वात माेठा बदल झाला. त्यामुळे विजयी जल्लाेष करणाऱ्या लुला आणि पराभव झालेल्या बाेल्सेनाराे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता चाहत्यांमधील राेषही शांत झाला आहे. सध्या हेच कार्यकते साेबत बसून फुटबाॅलच्या सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत.

ब्राझील टीमच्या जर्सीतून प्रचार ब्राझीलमध्ये राष्ट्रपती निवडणुकीचे वारे जाेमाने वाहत हाेते. यादरम्यान बाेल्सेनाराे यांनी प्रचारासाठी थेट ब्राझील फुटबाॅल टीमच्या जर्सीचा वापर केला. त्यामुळे फुटबाॅलप्रेमी आणि लुला यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली हाेती. या दाेघांच्या वतीने या प्रचाराला विराेध करण्यात आला हाेता. नेमारलाही चाहत्यांचा विराेध : डाव्या विचारसरणीचे बाेल्सेनाराे यांना फुटबाॅल टीमची जर्सी घालून प्रचार केल्याने विराेध करण्यात आला. याचपाठाेपाठ फुटबाॅलप्रेमींनी आता नेमारवरही टीका केली आहे. कारण, त्यानेही बाेल्सेनाराे यांनाच पाठबळ देण्याची कुटिल खेळी केली. कारण, त्याने माेठ्या करचाेरीतून आपली सुटका करून घेण्यासाठी त्यांना पाठबळ दिले.

बातम्या आणखी आहेत...