आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • After Training In Indore, The Indian Team Will Leave For Ahmedabad Today

येत्या गुरुवारपासून रंगणार चाैथी कसाेटी:इंदूरमध्ये सराव करून भारतीय संघ आज हाेणार अहमदाबादला रवाना

इंदूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिसऱ्या कसाेटीतील पराभवातून सावरलेल्या यजमान भारतीय संघाने इंदूरच्या मैदानावर कसून सराव केला. त्यानंतर भारतीय संघ अहमदाबादला आज साेमवारी रवाना हाेणार आहे. येत्या गुरुवारपासून बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी मालिकेमध्ये यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला सुरुवात हाेत आहे. यासाठी भारतीय संघाचे आज अहमदाबादमध्ये आगमन हाेणार आहे. अहमदाबादच्या मैदानावर मालिकेतील या शेवटच्या कसाेटी सामन्याचे आयाेजन करण्यात आले. गत तिसऱ्या कसाेटीत भारताला इंदूरच्या हाेळकर स्टेडियमवर पराभवाचा सामना करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवामुळे भारतीय संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेश लांबणीवर पडला. आता भारताला अहमदाबाद कसाेटीतील विजयाने ही फायनल गाठता येणार आहे. त्यामुळे भारताला या मैदानावर विजय आवश्यक आहे. यासाठी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विक्रम राठाेर यांनी संघातील फलंदाजांसाेबत सखाेल चर्चा करणारा संवाद साधला.

बातम्या आणखी आहेत...