आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • After Two And A Half Months, Saina And Sindhu Will Play : Badminton Training In Hyderabad From July 3, The Decision Was Taken By The Association

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:अडीच महिन्यांनंतर सायना, सिंधू उतरणार काेर्टवर; येत्या 3 जुलैपासून हैदराबादेत बॅडमिंटनची ट्रेनिंग, असाेसिएशनने घेतला निर्णय; स्पर्धेचे सप्टेंबरनंतर अायाेजन

रायपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अडीच महिन्यांपासून घरीच असलेल्या अाॅलिम्पिक पदक विजेत्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अाणि माजी नंबर वन सायना नेहवाल अाता लवकरच काेर्टवर उतरणार अाहेत. येत्या ३ जुलैपासून बॅडमिंटनच्या ट्रेनिंगला भारतामध्ये सुरुवात हाेत अाहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने अाता पुढच्या महिन्याच्या पहिल्याच अाठवड्यात सरावाला हैदराबाद येथील सेंटरमध्ये सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अाता भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू पुन्हा एकदा नव्या उमेदीने सरावाला सुरुवात करताना दिसतील. यातूनच अाता दाेन महिन्यांनंतर खेळाडू काेर्टवर अापल्या सरावाला सुरुवात करू शकणार अाहेत. काेराेनाच्या संकटामुळे या सराव सेंटर बंद केले हाेते.

फक्त पात्र खेळाडूंना प्राधान्य :
टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केलेल्या खेळाडूंना या सरावासाठी प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे अाता सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, साई प्रणीत (एकेरी) अाणि चिराग शेट्टी, सात्त्विक साईराज, रेड्डी (दुहेरी) यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाईल. याच सरावातून अाता टाेकियाे अाॅलिम्पिकसाठी फाॅर्म मिळवण्याचा या सर्वांचा मानस अाहे. त्यानंतर अाता दुसऱ्या टप्प्यानंतर इतर सर्व खेळाडूंना सराव करण्याची परवनागी देण्यात येईल, असेही महासंघाचे अजय सिंघानिया यांनी सांगितले.

प्रायाेजकांसाेबत चर्चेनंतरच लीग अायाेजनाचा निर्णय भारतामध्ये सध्या काेराेनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली अाहे. यातूनच सध्या तरी स्पर्धेचे अायाेजन करणे अवघड अाहे. त्यामुळेच अाम्हीही प्रायाेजकांशी सखाेल चर्चा करणार अाहाेत. याच चर्चेनंतर अाम्ही बॅडमिंटन प्रीमियर लीगच्या अायाेजनाचा निर्णय घेणार अाहाेत. गतवर्षी जानेवारी- फेबुवारीदरम्यान या लीगचे अायाेजन करण्यात अाले हाेेते. मात्र, अाता काेविड-१९ च्या वाढत्या धाेक्यामुळे यंदा या लीगचे अायाेजन हाेऊ शकले नाही. सध्याही याबाबत काेणत्याही प्रकारचा ठाेस असा निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे अाम्ही प्रायाेजकांशी चर्चा करून ठरवणार अाहाेत, अशी माहिती महासंघाचे अजय सिंघानिया यांनी दिली. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून अाहे.

बातम्या आणखी आहेत...