आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • BCCI Action Against Threatening Journalist: Boria Majumdar Banned For 2 Years, No Entry Into Stadium; Riddhiman Had Threatened Saha

धमकी देणाऱ्या पत्रकारावर BCCI ची कारवाई:बोरिया मजूमदारांवर 2 वर्षांची बंदी, स्टेडियममध्येही प्रवेश नाही; वृद्धिमान साहाला दिली होती धमकी

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

BCCI ने क्रिकेट इतिहासकार, पत्रकार आणि चरित्र लेखक बोरिया मजूमदारांवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. मजूमदार यांच्यावर मुलाखतीच्या नावाखाली यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला धमकावल्याचा आरोप आहे. दैनिक भास्करने पहिल्यांदाच खुलासा केला होता की, साहा एपिसोडमध्ये ज्या पत्रकाराचा उल्लेख आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो बोरिया मजूमदारच असल्याची खात्री पटली.

स्टेडियममध्ये प्रवेश बंदी

BCCI म्हणाले- आम्ही देशभरातील सर्व राज्य युनिट्सना कळवणार आहोत की बोरियाला कोणत्याही स्टेडियममध्ये प्रवेश देऊ नये. देशांतर्गत सामन्यांमध्येही बोरियाला माध्यम प्रतिनिधी म्हणून मान्यता दिली जाणार नाही. मीडिया मान्यता नसल्यामुळे मजूमदार यापुढे टीम इंडियाच्या कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकणार नाही

याशिवाय सर्व भारतीय खेळाडूंना बोरिया मजूमदार यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संभाषण करण्यास मनाई केली आहे. याशिवाय बोर्ड बोरियाबाबत ICC कडे तक्रार करणार असून जगभरात होणाऱ्या ICC स्पर्धांवर बंदी घालण्यास सांगितले आहे.

साहाने भारतीय क्रिकेटमधील दिलेल्या योगदानाच्या बदल्यात झालेल्या गैरवर्तनावर केला होता संताप व्यक्त

ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी गुजरात टायटन्सचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यात लिहिले की भारतीय क्रिकेटमध्ये इतके योगदान दिल्यानंतर, मी एका तथाकथित प्रतिष्ठित पत्रकाराकडून धमकीवजा वागणूक मला सहन करावी लागत आहे. आपल्या देशात पत्रकारिता कोणत्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे? साहा यांनी यावेळी मजूमदार यांचे स्क्रीनशॉट शेअर केले.

त्यावर लिहिले होते की, 'तुम्ही मला फोन केला नाही. मी यापुढे तुमची मुलाखत घेणार नाही. मी सहजासहजी केलेला अपमान सहन करत नाही. ही गोष्ट नेहमी माझ्या लक्षात राहील. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगीतले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयने उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आणि सर्वोच्च परिषदेचे सदस्य प्रभातेज भाटिया यांच्यासह 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीसमोर येऊन साहा यांनी मजूमदार यांना ओळखले आणि धमकावल्याचा आरोप केला. तथापि, आपल्या बचावामध्ये मजूमदार यांनी सांगीतले की स्क्रीनशॉट्समध्ये छेडछाड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...