आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी काल (दि.10) झालेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात खूप थकलेला पाहायला मिळाला. अनेकजण धोनीला फिट क्रिकेटर मानतात, पण कालच्या सामन्यात धोनीला एक-एक धाव घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे पाहायला मिळाले. यावरुन भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने धोनीवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
काल चेन्नई आणि हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादने चेन्नईचा पराभव केला. सामन्यात धोनीने 36 चेंडूत 47 धावा काढल्या खऱ्या पण, त्या धावा करताना धोनीची खूपच दमछाक झालेली पाहायला मिळाले. धोनीसारखा बेस्ट मॅच फिनिशर मैदानात असूनही चेन्नईच्या संघाला 165 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. दरम्यान, टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाणने एक ट्वीट करुन नाव न घेता महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. इरफानने ट्वीट केले की, 'काही लोकांसाठी वय हा केवळ एक आकडा असतो, तर काहींसाठी संघाबाहेर ठेवण्याचे कारण.'
Age is just a number for some and for others a reason to be dropped...
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 3, 2020
इरफानच्या ट्वीटमध्ये महेंद्र सिंह धोनीचे नाव नसले, तरी कालच्या सामन्यात धोनीच्या परिस्थितीवरुन इरफानने धोनीला टार्गेट केल्याची चर्चा आहे. इरफानच्या पोस्टवर तशा कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. काहींनी इरफानचे समर्थन केले तर धोनीच्या चाहत्यांनी धोनीची बाजू मांडली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.