आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोरोक्कोची संरक्षण फळी भेदत फ्रान्स वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला. अंतिम सामना रविवारी फ्रान्स-अर्जेंटिना यांच्यात होईल. सर्वांच्या नजरा ३५ वर्षीय लियोनेल मेसीवर असतील. तो चपळाईच्या बळावर २०-२२ वर्षांच्या खेळाडूंना नाचवतो. दुसरीकडे १२ वर्षांनी लहान फ्रेंच खेळाडू एमबापे असेल. फुटबॉलचा उसेन बोल्ट मानला जाणारा एमबापे सामना फिरवण्यात पटाईत आहे.
लियोनेल मेसी
मेसी हा कोणत्याही वर्ल्डकपमध्ये ५ गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. अंतिम सामना अद्याप बाकी आहे. वर्ल्डकप करिअरमध्ये ११ गोल केले आहेत. अर्जेंटिनात फुटबॉलचा देव मानला जाणारा मॅरेडोनाही असे करू शकला नव्हता. असे करणारा मेसी हा आपल्या देशाचा एकमेव खेळाडू आहे. वर्ल्डकप करिअरमध्ये १९ असिस्ट. असे केवळ ब्राझिलियन रोनाल्डो व जर्मन मिरास्लोव्हने केले. अंतिम सामन्यात एकही असिस्ट केले तर इतिहास होईल.
लागोपाठ ४ वर्ल्डकपमध्ये गोल आणि असिस्ट करणारा १९६६ नंतर पहिलाच.
किलियन एमबापे
(२३ वर्षे) वेगाचा बादशहा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ५ गोल. मागच्या वर्ल्डकपमध्ये ४ गोल. केवळ २३ वर्षे वयात वर्ल्डकप करिअरमध्ये ९ गोल करणारा पहिला खेळाडू. महान फुलबॉलपटू पेले २४ वर्षांचे असताना असे करू शकले होते.
केवळ २ वर्ल्डकपमध्ये ९ गोलचा विक्रम. कारण झिदानसारखे खेळाडूही करिअरच्या सुरुवातीला दोन वर्ल्डकपमध्ये ५ गोलपेक्षा जास्त करू शकले नव्हते. मेसीने ९ गोल २५ वर्ल्डकप सामन्यांत केले, तर एमबापेने केवळ १३ सामन्यांत ९ गोल केले आहेत. अजून तो कमीत कमी तीन वर्ल्डकप आणखी खेळू शकतो. म्हणजे तो महान खेळाडू होऊ शकतो.
अर्जेंटिना 1986 मध्ये चॅम्पियन
. मेसी करिअरचा पहिला वर्ल्डकप जिंकेल. ब्राझील, जर्मनी, इटलीप्रमाणे तीन वर्ल्डकप जिंकणारा चौथा संघ ठरेल. २० वर्षांनंतर चषक युरोपबाहेर जाईल. २००२ मध्ये ब्राझील जिंकला होता.
फ्रान्स जिंकल्यास... ६० वर्षांचा विक्रम मोडेल
ब्राझीलने १९६२ मध्ये ही कामगिरी केली. १९३८ मध्ये इटलीही विजेता.
फ्रेंचचे शॅम्प दुहेरी किताब मिळवून देणारे १९३८ नंतर पहिले प्रशिक्षक होतील.
अर्जेंटिना चौथ्यांदा फायनल हरेल, १९३०, १९९०, २०१४ मध्ये हरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.