आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाओमी ओसाका वादाच्या भोवऱ्यात:आयएमजीसोबतचा करार संपुष्टात; ओसाकाची स्वत:ची स्‍पोर्टस संस्था!

मॅथ्यू फटरमॅन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सुपरस्टार टेनिसपटू म्हणून जपानच्या नाओमी ओसाकाने आपली ओळख निर्माण केली. मात्र गत दीड वर्षापासून वेगळ्याच प्रकरणामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. याच कारणामुळे तिने मानसिक शांततेसाठी टेनिसमधून काही दिवस विश्रांतीही घेतली होती. त्यामुळे तिने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. तिने आपण आगामी सत्रातील ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता तिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता जपानच्या टेनिसपटू ओसाकाने अमेरिकन स्‍पोर्ट‌्स मॅनेजमेंट कंपनी इंटरनॅशनल मॅनेजमेंट ग्रुपसोबतचा (आयएमजी) करार संपुष्टात आणला आहे. तिने स्वत:ची स्‍पोर्ट‌्स संस्था सुरू करणार असल्याचेही सांगितलेे.

जपानच्या २४ वर्षीय ओसाकाने गतवर्षी जवळपास ४६५ कोटींची कमाई केली होती. यामध्ये ४२५ कोटी तिने प्राहोजकत्वातून कमावले आहेत. आता तिने आपल्याच संस्थेच्या माध्यमातून युवांना अत्याधुनिक स्वरूपातील तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. यासाठी तिने आपल्या लाँगटाइम एजंट स्टुअर्ट डुगिडसोबत स्‍पोर्ट‌्स मॅनेजमेंटसाठी करार केला आहे. याच डुगिडच्या माध्यमातून आता ती आपल्या संस्थेचा विकास साधणार आहे. त्यामुळे आता याचा निश्चित असा माेठा फायदा सर्वांना होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. तिने यासाठी खास होजना आखली.

बातम्या आणखी आहेत...