आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्वचषक:अगुइलाेची फ्रीस्टाइल लक्षवेधी; स्टेडियमसमाेर चाहत्यांची गर्दी

दाेहाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील ३२ संघांतील खेळाडूंसाेबतच काही माेजक्या चाहत्यांचीही नावे सध्या फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेदरम्यान अधिकच चर्चेत येत आहेत. यामध्ये सध्या ब्राझीलचा वुआनराे अगुइलाेचे नाव सध्या फारच गाजत आहे. कारण, ताे सध्या स्टेडियमच्या बाहेर फुटबाॅलमधील आपले काैशल्य सादर करत आहे. यातून जगभरातील चाहते हे त्याच्या फ्रीस्टाइल किकने अधिकच आकर्षित हाेत आहेत. यातून त्याची डान्सिंग, जगलिंग आणि अॅक्राेबॅटिक्सची कला ही अधिकच लक्षवेधी ठरत आहे. १९८५ मध्ये अगुइलाेचा जन्म दक्षिण अमेरिकन देश चिलीमध्ये झाला. जन्मत:च त्याला फाेकाेमेलिया झाला हाेता. त्यामुळे जन्मत:च त्याचे दाेन्ही हात हे पूर्णपणे विकसित हाेऊ शकले नाहीत. मात्र, तरीही त्याने हार मानली नाही. फुटबाॅलमधील आपला छंद जाेपासत ताे सध्या विनाहाताची फ्रीस्टाइल किक मारून जगभरातील चाहत्यांना आपलेसे करत आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षीच जगलिंगची कला आत्मसात केली.

बातम्या आणखी आहेत...