आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण कामगिरी:अहिल्या शिंदेने जिंकले आशियाई कुस्तीत सुवर्ण

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बिस्किक (किर्गिस्तान) येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या अहिल्या शिंदेने सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या युवा मल्ल अहिल्याने ४९ किलाे वजन गटातील अंतिम फेरीत यजमान किर्गिस्तानच्या वालील हिला ५-३ गुणांनी पराभूत केले. अहिल्या इंदापूर (पुणे) येथील खेळाडू आहेत. सध्या ती हरियाणा येथे कुस्तीचा सराव करते. नुकत्याच रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय संघ निवड चाचणी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले होते.