आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॅडमिंटनच्या विश्वातील प्रतिष्ठेच्या ल इंग्लंड ओपनचा किताब जिंकण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू सज्ज झाले आहेत. मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. यातून लक्ष्य सेन, श्रीकांत, सायना आणि सिंधूला गत २२ वर्षांपासूनची या स्पर्धेच्या किताबाची स्वप्नपूर्ती करता येणार आहे. यापूर्वी प्रकाश पदुकाेणने १९८० आणि २००१ मध्ये पी. गाेपीचंदने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकेरीचा किताब पटकावला हाेता. त्यानंतर आता दाेन दशकांदरम्यान एकाही खेळाडूला या स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळवता आला नाही. गतवर्षी लक्ष्य सेनने फायनल गाठली हाेती. मात्र, यातील पराभवाने ताे उपविजेता ठरला हाेता. गत उपविजेत्या लक्ष्य सेनसह के.श्रीकांत, एचएच प्रणय, सायना, सिंधू हे एकेरीच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारताचे दहा बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
सायना-सिंधू उत्सुक सायना नेहवाल ही ल इंग्लंड ओपनची फायनल खेळणारी एकमेव भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. आता ती याच २०१५ मधील कामगिरीला उजाळा देण्यासाठी उत्सुक आहे. तसेच डबल लिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूनेही या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सर्वाेत्तम कामगिरीसाठी कंबर कसली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.