आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Alcaraj Defeated Last Champion Hercules; The 18 year old Alkaraj Is The Second Young Player To Reach The Final |marathi News

मियामी मास्टर्स:अल्कराजने गत चॅम्पियन हरकेजला हरवले; 18 वर्षीय अल्कराज फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा युवा खेळाडू

मियामी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्कराज मियामी मास्टर्सच्या फायनलमध्ये पाेहोचला. उपांत्य सामन्यात अल्कराजने गत चॅम्पियन ह्यूबर्ट हरकेजला सरळ सेटमध्ये ७-६, ७-६ ने मात दिली. आता फायनलमध्ये त्याचा सामना नॉर्वेचा स्टार खेळाडू कॅस्पर रूडशी होईल.

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील रूडने उपांत्य लढतीत अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरंडोलोला ६-४, ६-१ ने हरवले. मियामी मास्टर्सच्या इतिहासात अंतिम लढतीत पोहोचलेला अल्कराज जगातील दुसरा सर्वात युवा खेळाडू बनला. सर्वात कमी वयाचा विक्रम राफेल नदालच्या नावे आहे. नदालने २००५ मध्ये मियामीच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. अल्कराजने किताब जिंकल्यास तो मियामी मास्टर्स जिंकणारा सर्वात युवा खेळाडू बनेल. सध्या अल्कराजचे वय १८ वर्षे ३३३ दिवस आहे. त्याचबरोबर सन २०२२ मध्ये आतपर्यंत त्याने १९ पैकी १७ सामन्यात विजय मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...