आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माद्रिद ओपन:स्पेनच्या युवा टेनिसपटूने सत्रामध्ये जिंकला चौथा किताब, अल्कारेझ दुसऱ्यांदा माद्रिद ओपनचा चॅम्पियन

दिव्य मराठी नेटवर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिदस्पेनचा २० वर्षीय टेनिसपटू कार्लाेस अल्कारेझ यंदाच्या सत्रातील माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये जर्मनीच्या जेन लेनार्डचा ६-४, ३-६, ६-३ ने पराभव केला. यासह ताे करिअरमध्ये सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत पुरुष एकेेरीच्या किताबाचा मानकरी ठरला.

तसेच २०१४ नंतर अल्कारेझ हा माद्रिद ओपनमध्ये सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेणारा पहिला टेनिसपटू ठरला अाहे. यापूर्वी हा पराक्रम माजी नंबर वन राफेल नदालने गाजवला हाेता. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अल्कारेझने अापली लय कायम ठेवताना यंदाच्या सत्रात सलग चाैथ्या किताबाचा बहुमान पटकावला. अाता अागामी राेम मास्टर्समधील किताबाने अल्कारेझला नंबर वन टेनिसपटू हाेण्याची संधी अाहे.