आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • All England Open Badminton : Prannoy's Triumphant Opening; Saina's Retreat, Today On Sindhu Court, Love's One sided Victory

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन:प्रणयची विजयी सलामी; सायनाची माघार, आज सिंधू काेर्टवर, प्रणयचा एकतर्फी विजय

लंडन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणयने मंगळवारी पहिल्याच दिवशी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यामध्ये तैवानच्या वांगचा सरळ दाेन गेममध्ये पराभव केला. त्याने २१-१९, २२-२० ने सामना जिंकला. यासह त्याला पुढच्या फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता आला. यादरम्यान २०१५ मधील उपविजेत्या सायना नेहवालने स्पर्धेतून माघार जाहीर केली. त्यामुळे महिला एकेरीमध्ये किताबाची मदार डबल ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूवर असणार आहे. सिंधू बुधवारपासून आपल्या किताबाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करणार आहे. तिचा सलामी सामना चीनच्या जँगशी हाेणार आहे. तिचा या सलामी सामन्यातील विजयाचा दावा मजबूत मानला जात आहे. यातून तिला स्पर्धेत दमदार विजयी सलामीने सुरुवात करता येणार आहे. सायनाने माघार घेतल्याने आता सिंधूला सर्वाेत्तम कामगिरी करावी लागणार आहे. गत उपविजेत्या लक्ष्य सेनसह के.श्रीकांत, प्रणय, सिंधू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...