आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी -20 विश्‍वचषक:बांगलादेश संघाचा आराेप , विराट काेहलीची सामन्यात फेक फील्डिंग

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाच्या माजी कर्णधार विराट काेहलीने साेमवारी सामन्यात फेक फील्डिंग केली, असा आराेप बांगलादेश संघाने लावला. मात्र, याबाबत अद्याप आयसीसीने काेणत्याही प्रकारचा दुजाेरा दिला नाही. याच सामन्यात भारताने ५ धावांनी बांगलादेश टीमवर मात केली. पराभवानंतर बांगलादेश संघाच्या यष्टिरक्षक फलंदाज नुरुलने पत्रकार परिषदेत काेहलीवर फेक फील्डिंग केल्याचा आराेप लावला. सातव्या षटकादरम्यान हातात चेंडू नसतानाही काेहलीने ताे फेकल्यासारखे केले, असेही त्याने यादरम्यान सांगितले. आयसीसीच्या नव्या नियमानुसार अशा प्रकारचे कृत्य हे कारवाईस पात्र ठरणारे आहे. यामुळे भारतावर पाच धावांची कारवाई हाेऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...