आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • American Baseball Team's Manny Prefers Chess; Accurate Gait, Peace Of Mind And Concentration

मॅनी हा बुद्धिबळातही तरबेज:अमेरिकन बेसबॉल टीमच्या मॅनीची बुद्धिबळाला पसंती; अचूक चालीने मानसिक शांतता व एकाग्रता

सॅन दिएगो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन प्राेफेशनल बेसबॉल टीम सॅन दिएगो पॅड्रेसचा मॅनी मचाडॉ हा सर्वात हिटर खेळाडू मानला जातो. त्याची मैदानावरील कामगिरी सातत्याने लक्षवेधी ठरते. मात्र, यासाठी तो वेगळ्याच डावपेचाच्या आधारे आपली प्रगती साधत आहे. बेसबॉलमध्ये सुपरस्टार हिटर असलेला मॅनी हा बुद्धिबळातही आता तरबेज झाला आहे. त्याने बुद्धिबळाला पसंती दर्शवली आहे. यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय दाैऱ्यावर असताना आपल्याच सहकाऱ्यांकडून बुद्धिबळाचे खास डावपेच आत्मसात केले. त्यामुळे आता तो मैदानावरील ताण-तणाव दूर करण्यासाठी, मानसिक शांतता लाभण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी याच बुद्धिबळाचा वापर करतो. त्यामुळे बेसबॉल हिर्ट्सची बैठक पार पडली, की सर्व जण एक डाव बुद्धिबळाचा खेळतात.

पाच वेळच्या आॅल स्टार बेसबॉल टीमचा मॅनी हा प्रत्यक्षात बुद्धिबळ खेळतो. तर त्याचे काही सहकारी हे संगणकावरील चेकर्स खेळताना दिसतात. त्याने मानसिक शांततेसाठी हाच खास मार्ग असल्याचे सर्वांना सांगितले. त्याने २०१७ मध्ये शालेयस्तरावर असताना बुद्धिबळ खेळला होता. यादरम्यान तो सिएटल येथे जोनाथन स्कूलमध्ये हेता.

एंडरसनकडून गिरवले धडे :
स्टार हिटरने अल्पावधीतच बुद्धिबळातही आपला दबदबा निर्माण केला आहे. यासाठी त्याने माजी सहकारी आणि आेरिल्सचे कार्यकारी अधिकारी ब्रँडी एंडरसन यांच्याकडून बुद्धिबळाचे धडे गिरवले. एंडरसनने त्याला खास चाली शिकवल्या आहेत. ‘बुद्धिबळ हा खेळ फारच आवडीचा आहे. मानसिक शांतता मिळते. तसेच माझी एकाग्रताही वाढली आहे. हे खेळताना आपल्यापेक्षा प्रतिस्पर्धी वेगळ्या पद्धतीनेही विचार करतो, याची जाण होते, असे तो म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...