आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात ३८२ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार आहे. ५ फेब्रुवारीपासून चेन्नईत भारत व इंग्लंड यांच्यात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. १९ जानेवारी २०२० रोजी बंगळुरूमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया अखेरचा सामना झाला होता. १२ मार्च रोजी धर्मशाळेत द. आफ्रिकाविरुद्ध पावसामुळे नाणेफेकीनंतर सामना रद्द झाला. भारत-इंग्लंड मालिकेनंतर कसोटी चॅम्पियनशिपचा अखेरचा सामना कोण खेळेल हे निश्चित होईल. मालिकेतील दुसरा सामनादेखील चेन्नईत व तिसरा-चौथा सामना अहमदाबादला होईल.
प्रेक्षकांना दुसऱ्या सामन्यात प्रवेश
१३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळेल. यापूर्वी न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनानंतर पहिल्या मालिकेत चाहत्यांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी मिळाली होती. चेपॉकची क्षमता ५० हजार आहे.
४ वर्षे, १४ सामन्यांपासून भारत घराच्या कसोटीत अजेय
भारतीय संघाचा घरच्या मैदानावर अखेरचा पराभव फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झाला. त्यानंतर झालेल्या १४ कसोटीत संघाने ११ विजय मिळवले व ३ बरोबरीत सुटल्या. भारताला घरच्या मैदानावर अखेरच्या कसोटी मालिकेत २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर संघाने १२ मालिकेत ३४ सामने खेळले, ज्यात २८ विजय व १ कसोटी गमावली. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० ने विजय मिळवला होता.
चेन्नईत १९९९ मध्ये अखेरचा पराभव
भारताने इंग्लंडविरुद्ध १२२ कसोटीत २६ विजय मिळवले. त्यानंतर येथे झालेल्या ८ कसोटींपैकी भारतानेे ५ मध्ये विजय मिळवला व ३ सामने बरोबरीत राखले. २०१६ मध्ये येथील अखेरच्या कसोटीत भारताने इंग्लंडला डाव व ७५ धावांनी नमवले.
विजयाची आशा, कारण त्यानंतर देशातील ३४ सामन्यांपैकी १ लढत गमावली; इंग्लंडला ४-० ने हरवले
भारताने इंग्लंडविरुद्ध १२२ कसोटींपैकी केवळ २६ जिंकल्या. संघाची विजयाची सरासरी २१.३१ राहिली, जी SENA देशाविरुद्ध (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. अाफ्रिका) सर्वात खराब आहे. भारताचे सर्वाधिक ४७ पराभव झाले. ते इंग्लंडविरुद्ध. फिरकीविरुद्ध चांगल्या खेळणाऱ्या ओली पोपला इंग्लंडने संघात स्थान दिले.
खेळपट्टी : क्युरेटरने ५ खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. सर्वांवर चांगले गवत आहे. त्यानंतरही भारत ३ फिरकीपटू व २ वेगवान गोलंदाजांसह उतरेल. डावखुऱ्या अश्विन व कुलदीप यादवसोबत अक्षर पटेलला संधी मिळू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.