आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत राहणाऱ्या 14 वर्षीय अनाहत सिंहने क्रीडा जगतात चमत्कार घडवले आहे. सहसा या वयातील मुले स्कूल बॅग आणि व्हिडिओ गेममध्ये गुंतलेली असतात. पण, अनाहत हीने या तरुण वयात राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंतचा प्रवास केला आहे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या या खेळांमधील ती सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे.
अनाहतने शुक्रवारी तिचा राउंड ऑफ 64 सामना जिंकला आहे. सीनियर गटातील तिच्या कारकिर्दीतील हा पहिलाच विजय आहे. सलामीच्या लढतीत तिने सेंट व्हिन्सेंटच्या जॅडा रॉसचा 11-5, 11-2, 11-0 असा पराभव केला.
विजयानंतर म्हणाली - माझ्याकडे गमावण्यासारखे काही नव्हते
विजयानंतर अनाहतने सांगितले की, हे खरोखर खूप रोमांचक आणि आनंदाचे आहे. ही माझी पहिली सीनियर गटातील पहिलीच स्पर्धा आहे, त्यामुळे काय अपेक्षा करावी हे मला कळत नव्हते, पण जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला.
माझ्याकडे गमावण्यासारखे असे काही नव्हते. माझ्या कुटुंबातील बरेच सदस्य येथे आहेत आणि ते सर्व मला प्रोत्साहन देत होते, जोर जोरात माझ्यासाठी चिअर्स करत होते.
प्रशिक्षक म्हणाले - तिला कोर्टाची चांगली समज आहे
प्रशिक्षक ख्रिस वॉकर म्हणाले की, तिच्याकडे समस्या सोडवण्याची उत्तम कौशल्ये आहेत. ती खूप हुशार आहे. तिला कोर्टाची चांगली समज आहे आणि ती रॅकेटचा चांगला उपयोग करते. 14 व्या वर्ष असलेल्या तिची प्रतिभा विकसित करण्यात मला मदत करायची आहे. तिच्यासोबत काम करताना मी घालवलेला थोडा वेळ खूप शानदार आहे आणि हे भविष्यासाठी खूप रोमांचक आहे. ती एक चांगली मुलगी आहे.'
प्रशिक्षक पुढे म्हणाले की अनाहतकडे या खेळाकडे लक्ष वेधून घेण्याचा दृष्टीकोन चांगला आहे. ती फक्त या खेळातल्या प्रवासाचा आनंद घेत आहे. हरण्याची तिची कोणतीही शक्यता नसताना तिने तिसरा गेम सहज असा 11-0 ने जिंकला. ती पूर्ण गांभीर्याने खेळते. ती खेळत असताना तिच्या खेळात परिपक्वता जाणवते.
'अनाहतची 15 वर्षांखालील स्तरावरील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय संघात निवड करण्यात आली होती, ज्यामध्ये यावर्षी आशियाई ज्युनियर स्क्वॉश आणि जर्मनओपनमधील विजयांचाही समावेश आहे.
लहान बहिणींच्या प्रेमळ शुभेच्छा...
अनाहतच्या लहान बहिणींनी आदल्या दिवशी तिला शुभेच्छा पाठवल्या होत्या. तुम्ही पण ऐका या लहान बहिनींचा संदेश, काय म्हणाल्या...
बहिणीसोबत स्क्वॅश खेळायची
नववीत शिकणारी अनाहत ही 6 वर्षांची असताना तिच्या बहिणीसोबत स्क्वॅश खेळायला जायची. पण नंतर तिला बॅडमिंटनमध्ये करिअर करायचे होते. बहिणीसोबत खेळताना अनाहतला ती स्क्वॅशच्या प्रेमात कधी पडले ते तिला कळलेच नाही. वयाच्या 8 व्या वर्षापासून 2 वर्षानंतर अनाहतने या खेळाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली.
6 वर्षांच्या कारकिर्दीत जिंकली आहेत 46 राष्ट्रीय पदके
अनाहताने 6 वर्षांच्या कारकिर्दीत 46 नॅशनल सर्किट टूर्नामेंट्स, 2 नॅशनल सर्किट टायटल्स, दोन नॅशनल चॅम्पियनशिप टायटल जिंकले आहेत. तिने 8 आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहेत. ब्रिटिश ज्युनियर स्क्वॅश ओपन (2019) आणि US ज्युनियर स्क्वॉश ओपन (2021) ही तिची प्रमुख विजेतेपदे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.