आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Analysis Australia, England Strong Because Of All rounders; India's Batting Is Good, Pakistan's Middle Order Is A Flop

अॅनालिसिस:अष्टपैलू खेळाडूंमुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघ बलाढ्य; भारताची फलंदाजीच सरस, पाकची मधली फळी फ्लाॅप

चंद्रेश नारायणन | मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या २२ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० फाॅरमॅटच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत १६ संघ सहभागी हाेणार आहेत. या संघांमध्ये एकूण ४५ सामने रंगणार आहेत. आतापर्यंत या स्पर्धेसाठी १६ पैकी १५ संघ जाहीर झाले आहेत.

भारत
आघाडीला अनुभवी फलंदाज; गाेलंदाज फ्लाॅप
फलंदाजी : आघाडीच्या फळीत राेहित, काेहली, राहुल अनुभवी फलंदाज आहेत. सूर्यकुमार यादव, हार्दिकमध्येही झंझावाताची प्रचंड क्षमता आहे. दिनेश कार्तिकही फाॅर्मात आहे.

गाेलंदाजी : संघाची गाेलंदाजी विखुरलेली दिसते. त्यामुळे संघ प्रतिस्पर्धीला राेखण्यात अपयशी ठरत आहेत. भुवी महागडा ठरत आहे. बुमराह, हर्षल दुखापतीनंतर कमबॅक करत आहेत. अर्शदीप-चहलकडून माेठी आशा आहे.

अष्टपैलू : इतर संघांच्या तुलनेत भारताकडे स्टार अष्टपैलूंचा अभाव आहे. हार्दिक व अक्षर दावेदार आहेत. दीपक हुडाही गाेलंदाजीत तरबेज आहे.
दुबळी बाजू : सुमार गाेलंदाजीमुळे संघ अडचणीत येत आहे.

पाक
रिझवान, बाबर सरस; मधळी फळी अपयशी

फलंदाजी : रिझवान व कर्णधार बाबर आझममुळे फळी मजबूत. मधल्या फळीला कसरत करावी लागेल. शान मसूनही फाॅर्मात आहे. त्यामुळे त्याचा संघाला आता निश्चित असा माेठा फायदा हाेइल.

गाेलंदाजी : वेगवान गाेलंदाजी ही संघाची मजबूत बाजू आहे. संघात १५० किमी/प्रतितास वेगाने चेंडू टाकणारे गाेलंदाज आहेत. शाहीन आफ्रिदी आता पूर्णपणे फिट झालेला नाही.

अष्टपैलू : शादाब खान व माे. नवाज संघात अष्टपैलू आहेत. नसीमही परफेक्ट मानला जाताे. त्याने सत्रात ही क्षमता सिद्ध केली आहे. दुबळी बाजू : मधल्या फळी डाेकेदुखी आहे.

ऑस्ट्रेलिया | सर्वात अनुभवी संघ; सगळेच खेळाडू फाॅर्मात फलंदाजी : बिग हिटर टीम डेव्हिडचा लाइन-अपमधील सहभाग अधिक राेमांचक ठरेल. वाॅर्नर, मॅक्सवेल, मिशेल मार्श, स्टाेइनिस, मॅथ्यू वेडसारखे अनुभवी खेळाडू आहेत.

गाेलंदाजी : स्टार्क, कमिन्स, हेझलवूडमुळे बाजू मजबूत आहे. अॅडम झम्पाचा लेग-स्पिन निर्णायक फॅक्टर ठरताे. ऑलराउंडर : मार्श, स्टाेइनिस, डेव्हिड, एगर, मॅक्सवेलच्या रूपात अनेक अष्टपैलू. कमिन्समध्येही क्षमता आहे.

दुबळी बाजू : कर्णधार फिंचचे अपयश संघासाठी डाेकेदुखी आहे. स्मिथचे फलंदाजीचे स्थान अद्यापही अनिश्चित आहे.

इंग्लंड | सामन्याला कलाटणी देण्यासाठी मलान-स्टाेक्स सक्षम फलंदाजी : गत तीन वर्षांनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या अॅलेक्स हेल्सच्या नावाची चर्चा आहे. जेसन राॅय, बेअरस्टाेला विश्रांती. युवा खेळाडू ब्रुक, फिल साल्टला संधी दिली.

-गाेलंदाजी :वेगवान गाेलंदाज मार्क वूड व क्रिस वाेक्सने संघात कमबॅक केले. रिस टाेपले, डेव्हिड व्हिले, जाॅर्डनमुळे संघाची बाजू मजबूत आहे. फिरकीचे पथकही सरस आहे.

अष्टपैलू : माेईन अली, स्टाेक्स, सॅम कॅरेन, व्हिले, वाेक्स व लिव्हिंगस्टाेनसारखी अष्टपैलूंची माेठी फाैज संघाकडे आहे. त्यामुळे कर्णधार बटलरसाेबत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

दुबळी बाजू : बटलरचा फाॅर्म सध्या चिंतेचा विषय आहे.

न्यूझीलंड | वेगवान गाेलंदाजी अधिक तरबेज फलंदाजी : विलियम्सन पुन्हा एकदा मजबूत लाइन-अपचे नेतृत्व करत आहे. डेरिल मिचेल, काॅन्वे, गुप्टिलसारखे तगडे फलंदाज संघात आहेत.

गाेलंदाजी : टीम साऊथी व ट्रेंट बाेल्टचा अनुभव फायदेशीर ठरेल. अॅडम मिलने व लाॅकी फर्ग्युसनची वेगवान गाेलंदाजी उपयाेगी ठरेल. ईश साेढी-मिशेल सँटनरची फिरकीही सरस.

अष्टपैलू : निशन, सँटनर, मिशेलसारखे तगडे ऑलराउंडर आहेत. फिलिप्स व ब्रेसवेल गाेलंदाजीसाठीही सक्षम आहेत. दुबळी बाजू : विलियम्सन व गुप्टिलची सुमार खेळी

द. आफ्रिका |बिग हिटर, पेस-स्पिनचा सर्वाेत्तम समन्वय फलंदाजी : तेंबा बावुमा दुखापतीनंतर कमबॅक करत आहे. डिकाॅक, क्लासेन, हेड्रिक्सही फाॅर्मात आहेत. रिली राेसाेऊचा अनुभव फायदेशीर ठरेल.

गाेलंदाजी : वेगवान गाेलंदाज हे माेठे प्रबळ हत्यार संघाकडे आहे. रबाडा व नाेर्कियामुळे संघाचा दबदबा राहील. एनगिडी नव्या चेंडूवर दमदार सुरुवात करून देऊ शकताे.

अष्टपैलू : मार्कराम, ड्वेन प्रिटाेरियस व पार्नेल हे गुणवंत अष्टपैलू खेळाडू आहेत. दुबळी बाजू : कर्णधार बावुमाच्या लाइन-अप स्थानाबाबत अनेक प्रश्नचिन्ह.

बांगलादेश | कर्णधार शाकिब अधिक तरबेज, अनुभवींचा अभाव फलंदाजी: नुरूल हसन व लिटन दासचे दमदार पुनरागमन झाले. अनुभवी माजी कर्णधार महमुद्दुल्लाह बाहेर झाला आहे. रहीमने निवृत्ती घेतली. त्यामुळे संघाची मदार ही शाकीब, नुरुल व सब्बीर रहमानवर असेल.

गाेलंदाजी : मुस्तफिजूरमुळे संघाचा दबदबा राहणार आहे. तस्कीन अहमद व इबादत हुसेनची गाेलंदाजी फलंदाजांना ठरेल अडसर. मेहदी हसन व मेसादेकही संघात आहेत.

अष्टपैलू : कर्णधार शाकीब हा सर्वाेत्तम कामगिरीत तरबेज. दुबळी बाजू : लाइन-अपमधील अनुभवाचा अभाव.

अफगाणिस्तान | फलंदाजीने अडचणी; फिरकीमध्ये तरबेज फलंदाजी: गुरबाजची आशिया कपमधील कामगिरी लक्षवेधी ठरली. झाझई आणि नजीबुल्ला झादरानवर आता सर्वांची नजर असेल. दारविश रसूलीच्या कमबॅकचे माेठे पाठबळ.

गाेलंदाजी : अहमदच्या फिरकीमुळे संघाला वर्चस्व गाजवता येईल. नव्या वेगवान गाेलंदाज सलमीच्या पुनरागमनामुळे संघ मजबूत आहे. राशिद, मुजीबही फाॅर्मात आहेत.

अष्टपैलु : कर्णधार नबी आणि ओमारजई यांच्याकडून माेठ्या खेळीची आशा. ते संघात अधिक तरबेज आहेत. दुबळी बाजू - सुमार फलंदाजीमुळे संघासमाेर अडचणी.

बातम्या आणखी आहेत...