आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:थिडवीसाेबत खेळताना मैदानावर अनके स्टारची दमछाक

नोम पेन्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगी असल्याने जन्मताच आई-वडिलांनी अनाथालयामध्ये ठेवले. मात्र, या ठिकाणी मिळालेल्या चांगल्या साेयी-सुविधांमुळे थिडवीला नव्याने वेगळे करण्याची ऊर्जा मिळाली. याच ठिकाणी ितने प्रचंड मेहनतीच्या बळावर फुटबाॅलच्या खेळात आपली वेगळी आेळख मिळवली. त्यामुळेच आजच्या घडीला १३ वर्षीय साेवन थिडवीसाेबत खेळताना अनेक अव्वल दर्जेदार फुटबाॅलपटूंची दमछाक हाेताना दिसते.

तिची फुटबाॅलच्या मैदानावरील कामगिरी लक्षवेधी ठरते. चेंडूंवरील अचूक नियंत्रण आणि आक्रमकपणामुळेच थिडवीला फुटबाॅलच्या वि‌श्वात आपला ठसा उमटवता आला. सोवन थिडावा ही कंबोडियातील एका एनजीओमध्ये वाढली. तिला आपल्या आई-वडिलांविषयी अद्यापही काहीच माहिती नाही. जन्मताच त्यांनी थिडावाचा त्याग केला. तिला एका एनजीआेने सांभाळले. या एनजीओमध्ये त्यांना काही स्टिरिअोटाइपचा सामना करावा लागला. एनजीओमधली मुलं खेळ खेळायला बाहेर पडली की, मुलींना एनजीओमध्ये राहून नाचायला आणि चित्र काढायला प्रोत्साहन देण्यात येत असे, असेही तिने सांगितले. मात्र, २०१८ मध्ये यात माेठा बदल झाला. आम्हाला गेलिक फुटबाॅलच्या प्रशिक्षणासाठी मैदानावर जावे लागले. यामुळे मेहनत करण्याची सवय लागली. गेलिक फुटबॉल हे रग्बी आणि फुटबॉलचे मिश्रण आहे. दोन्ही खेळांचे नियम एकत्र करतात. या खेळाचा जन्म आयर्लंडमध्ये झाला. कार्डे खमेर नावाच्या गेलिक फुटबॉल क्लबने थिडावाला क्रीडा प्रशिक्षणासाठी बोलावले होते. क्लबचे अध्यक्ष शिहान स्पष्ट करतात की, क्लबने फक्त काही स्पर्धा पाहण्यासाठी सुरुवात केली, परंतु कंबोडियन खेळाडूंनी क्लबमध्ये रस दाखवण्यास सुरुवात केली. शिहान सांगतात की, थिडावाने वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी खेळायला सुरुवात केली. थिडावा हा आक्रमक खेळाडू आहे.

प्रशिक्षक शिहान म्हणाले की, लवकरच ९०% कंबोडियन खेळाडू आमच्या क्लबमध्ये आले. ५० कंबोडियन खेळाडू रात्री सराव करतात. कंबोडियामध्ये हा खेळ प्रचलित असणे अवास्तव वाटते. खेळाडूंच्या कठोर परिश्रमामुळे, कार्डे खमेर क्लबचा महिला संघ २०१९ मध्ये दक्षिण आशियाई गेलिक खेळांच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला.