आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय हजारे ट्रॉफी:अंकितच्या शतकाने महाराष्ट्र विजयी,  पुद्दुचेरी संघावर 105 धावांनी विजय मिळवला

रांची7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय हजारे ट्रॉफीमध्ये एलिट ई गटातील सामन्यात कर्णधार अंकित बावणेच्या (१८७*) दीडशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने पुद्दुचेरीवर १०५ धावांनी विजय मिळवला. अंकितच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ६ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत २४ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला. मुंबई १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

पुद्दुचेरीने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजीस आमंत्रित केले. प्रथम खेळताना महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद ३७९ धावा उभारल्या. सलामीवीर राहुल त्रिपाठीने ७३ चेंडूंत ६१ धावा काढल्या. राहुल व अंकितने दुसऱ्या गड्यासाठी १२० धावांची खेळी भागीदारी केली. अंकित बावणेने १४३ चेंडूंचा सामना करताना २८ चौकार व ४ षटकार खेचत नाबाद १८४ धावा ठोकल्या. अजिम काझीने ५७ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. पुद्दुचेरीच्या अंकित शर्मा व रोहन सुरेशने प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात पुद्दुचेरी निर्धारित षटकांत ७ बाद २७४ धावा करू शकला. यात अष्टपैलू अंकित शर्माने नाबाद शतक झळकावले. त्याने १०३ चेंडूंत १०७ धावा काढल्या. पारस डोगराने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. महाराष्ट्राकडून मनोज इंगळे, सत्यजित बच्छावने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...