आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा4 जून 1993 चा दिवस. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सुरू होती. या सामन्यापूर्वी वॉर्नकडे क्रीडाविश्वात सरासरी फिरकीपटू म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यावर्षी अॅशेसच्या सुरुवातीच्या सामन्यात शेन वॉर्नने असा चेंडू टाकला ज्याने सारे जग थक्क झाले.
या चेंडूपासूनच वॉर्नची गणना अव्वल फिरकीपटूंमध्ये होऊ लागली. वॉर्नचा हा चेंडू 90 अंशापर्यंत फिरला होता, असे सांगितले जाते. त्यामुळे त्याला बॉल ऑफ द सेंच्युरीचा दर्जा देण्यात आला. शेन वॉर्नने वयाच्या 23 व्या वर्षी हा पराक्रम केला होता. आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाने वॉर्नसारखी गोलंदाजी केलेली नाही.
मँचेस्टर कसोटीत जगाला बसला आश्चर्याचा धक्का
29 वर्षांपूर्वी याच दिवशी शेन वॉर्नने मॅंचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेदरम्यान 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकला होता. या कसोटी सामन्यात वॉर्नने इंग्लंडचा फलंदाज माईक गॅटिंगच्या विकेटच्या त्रिफळा आकाशात उडवल्या होत्या..
ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत. प्रत्येक विकेटची वेगळी कहाणी आहे. मात्र, या सगळ्यात 'बॉल ऑफ द सेंच्युरी' मुळे शेन वॉर्नचे नाव क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेले आहे.
फिरकीचा महान जादूगार शेन वॉर्न या वर्षी आपल्यात नाही. ही गोष्ट चाहत्यांना अजून स्वीकारता आलेली नाही. क्रिकेटच्या मैदानावर त्याने असे अनेक पराक्रम केले, जे कित्येक वर्ष विसरले जाणार नाहीत
पहिल्याच षटकात 'बॉल ऑफ द सेंचुरी'
शेन वॉर्नने अॅशेस मालिकेतील पहिल्याच षटकात हा करिश्माई चेंडू टाकला होता, ज्याची आजवर चर्चा आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 289 धावांत सर्वबाद झाला होता.
त्याचवेळी इंग्लंड संघाकडून ग्रॅहम गूच आणि माइक आर्थटन सलामीला आले. या दोन्ही जोडीने 71 धावा केल्या आणि त्यानंतर आर्थटन बाद झाला. आर्थटन बाद झाल्यानंतर माईक गॅटिंग फलंदाजीला आला. शेन वॉर्नला गोलंदाजी करण्यास सांगितले होते. या सामन्यातील वॉर्नचे हे पहिलेच षटक होते.
शेन वॉर्नने माईक गॅटिंगला उडवलेला चेंडू टाकला, जो लेग स्टंपच्या बाहेर पडला. चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर जाईल, असे सर्वांना वाटत होते, पण चेंडू ऑफ स्टंपला लागला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. नंतर या चेंडूला शतकातील महान चेंडूचा किताब देण्यात आला.
अॅशेस मालिकेनंतर वॉर्न आला प्रसिद्धीच्या झोतात
शेन वॉर्नने 1992 साली भारताविरुद्ध सिडनी येथे कसोटी पदार्पण केले. मात्र, पहिल्या कसोटीत शेन वॉर्नला काही कमाल दाखवता आले नाही. या कसोटी सामन्यात त्याला एकच विकेट घेता आली.
त्याचवेळी अॅशेस मालिकेत पदार्पण करण्यापूर्वी शेन वॉर्नच्या नावावर 11 कसोटीत 32 विकेट्स होत्या.1992च्या बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 52 धावांत 7 बळी घेतले होते.
अॅशेस मालिकेत वॉर्नने चांगली कामगिरी केली. या मालिकेत त्याने 5 कसोटी सामन्यात 29 बळी घेतले.
गॅटिंगलाही बोल्ड होण्याचा क्षण कायम लक्षात
गॅटिंगचे यावर म्हणने आहे की तो हा चेंडू कधीच विसरणार नाही कारण याच चेंडूद्वारे तो इतिहासाचा एक भाग बनलाय .त्यामुळे हा क्षण त्याच्या कायमचा लक्षात आहे.
त्याचवेळी शेन वॉर्न म्हणाला की, मी असा चेंडू टाकू शकतो, असे मला कधीच वाटले नव्हते. वॉर्न म्हणाला की तो फक्त त्रिफळा उडवण्याचा प्रयत्न करत होता, पण चेंडू 90 अंशांवर फिरला, हे खरंच खूप आश्चर्यकारक असं घडलं.
शेन वॉर्न पुढे म्हणाला, 'बॉल ऑफ द सेंच्युरी' हा तोच चेंडू होता जो सर्व लेगस्पिन गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न करतात. या चेंडूने मैदानावर आणि मैदानाबाहेर माझे आयुष्य बदलले. मी 'बॉल ऑफ द सेंच्युरी' टाकला याचा मला खूप अभिमान आहे.
वॉर्नला जास्त आनंद झाला कारण गॅटिंग हा इंग्लिश संघात फिरकी खेळणारा सर्वात तरबेज असा खेळाडू होता. शेन वॉर्ननेही 'बॉल ऑफ द सेंच्युरी'चे त्याच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.