आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Another Big Upset After Argentina, 4 time World Champions Germany Were Defeated By Japan 2 1.

फिफा वर्ल्डकप:अर्जेंटिनानंतर आणखी एक मोठा उलटफेर,4 वेळचा विश्वविजेता जर्मनी संघाला जपानने 2-1 गोलने केले पराभूत

दोहा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा फिफा वर्ल्डकप सुरुवातीच्या उलटफेरसाठी स्मरणात राहील. बुधवारी जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानी असलेल्या जपानने चार वेळचा चॅम्पियन आणि ११व्या क्रमांकावरील जर्मनीला २-१ ने पराभूत केले. सामन्याच्या पूर्वार्धात जर्मनीच्या गुंदोगनने पेनल्टीद्वारे गोल करत आघाडी घेतली. मात्र, उत्तरार्धातील ७५व्या मिनिटाला जपानच्या रित्सू दोआन आणि ८३व्या मिनिटाला तामुको असानोने गोल करून जपानचा विजय निश्चित केला. त्याआधी मंगळवारी सौदी अरेबियाने स्टार फुटबॉलपटू मेसीच्या अर्जेंटिनाचा २-१ ने पराभव करत पहिला उलटफेर केला होता.

जपानची कुठेच बरोबरी नव्हती जर्मनी : २०व्यांदा वर्ल्डकप खेळतोय. या वर्ल्डकपपूर्वी १०९ सामने खेळला. ६७ विजय, २० हरला, २२ ड्रॉ. ४ वेळा चॅम्पियन. जपान : हा ७वा वर्ल्डकप. यापूर्वी २१ सामने खेळला. ५ जिंकला, ५ ड्रॉ, १ हरला. उपउपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही.

दुसरा सर्वात यशस्वी संघ, पण पराभूत {१९९० पासून २०१४ पर्यंत जर्मनीने वर्ल्डकपचा प्रत्येक ओपनिंग सामना जिंकला. तथापि, २०१८ मध्ये पहिल्या फेरीतून बाहेर पडला. तीनपैकी एकच सामना जिंकला. {जर्मनीच्या २०१४ च्या विजयी संघातील ३ खेळाडू मिडफील्डर थॉमस मूलर, गोलकीपर मॅनुअल नेऊर, स्ट्रायकर मारियो गोत्जे संघात आहेत, पण चालले नाही.

बातम्या आणखी आहेत...