आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसीचा मास्टर स्ट्रोक:अर्जेंटिनाने क्रोएशियाला 3-0 गोलने हरवले, 2014 नंतर पुन्हा फायनलमध्ये दाखल

लुसेल / रॉरी स्मिथ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन्ही बाह्या उंचावत लियोनेल मेसी त्या लोकांसमोर उभा होता, जे त्याचे चाहते आहेत. त्या सेकंदात त्याने लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिनाच्या चाहत्यांची गर्दी जमवली होती. पेनल्टीवर गोल करताच त्याने उडी मारली नाही, तर जल्लोष करणाऱ्या चाहत्यांसमोर उभे राहून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. अर्जेंटिनाला त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूची गरज असताना त्याने कोणतीही चूक केली नाही. मग अर्थातच हे वातावरण फार काळ टिकले नाही. ज्युलियन अल्वारेझने गोल केल्यावर मेसीने त्याच्या सहकाऱ्यांसोबत मैदानावर आनंद साजरा केला. स्टँडवरील चाहतेही नाच-गाणी करत आनंद साजरा करत होते.

अनेक वर्षांपासून अर्जेंटिनाची आशा होती. विश्वचषकाच्या सुमारे ४ आठवड्यांत अर्जेंटिनाने आत्मविश्वास जागवला. क्रोएशियाविरुद्धच्या त्यांच्या उपांत्य फेरीत फक्त १० मिनिटे शिल्लक असताना, अर्जेंटिनाने ३-० अशी आघाडी घेतली होती आणि स्टार मेसीला विश्वचषक जिंकण्यास मदत करण्यासाठी संघ एक पाऊल जवळ आल्याने त्यांचा आत्मविश्वासही वाढला. रविवारी होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मेसी संघाचे नेतृत्व करेल. आठ वर्षांनंतर त्याला पुन्हा एकदा सर्वकालीन महान खेळाडू बनण्याची संधी आहे. या विश्वचषकात ते जर्मनीविरुद्ध २०१४ च्या अंतिम सामन्यातील पराभवाची निराशा दूर करण्याचा प्रयत्न करतील.

चमत्कारिक मेसी : सर्वाधिक विश्वचषक सामने खेळणारा खेळाडू बनण्यापासून एक पाऊल दूर

उपांत्य फेरीत २ वेळच्या माजी विजेत्या अर्जेंटिनाने गत उपविजेत्या क्रोएशियाला ३-० ने हरवले. अर्जेंटिना सहाव्यांदा व २०१४ नंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचला. मेसीने ३४ व्या मि. पेनल्टीवर गोल केला. इतर २ गोल अल्वारेझने केले. त्याने ३९ व्या व ६९ व्या मिनिटाला मेसीच्या असिस्टवर गोल केले. मेसीचा हा पाचवा विश्वचषक आहे. त्याने विश्वचषकात २५ सामने खेळले. सर्वाधिक सामन्यांच्या बाबतीत तो लोथर मॅथियाससह संयुक्तपणे अव्वल आहे. फायनलमध्ये उतरताच तो सर्वाधिक विश्वचषक लढत खेळण्याचा विक्रम करेल.

  • मेसीने २००५ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी अर्जेंटिनाकडून पदार्पण केले आणि त्याने १७२ सामन्यांमध्ये ९७ गोल केले आहेत.
  • तो ४ वेगवेगळ्या विश्वचषकांत गोल व असिस्ट करणारा आणि विश्वचषकात टीन २० वर्षे, ३० वर्षे वयात गोल केलेला एकमेव खेळाडू आहे.
  • मेसीचा वरिष्ठ गटातील १००२ वा सामना. त्याने ७९१ गोल व ३४० असिस्ट केले. बार्सिलोनासाठी ३५ व पीएसजीसाठी १ ट्रॉफी जिंकली आहे.
बातम्या आणखी आहेत...