आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा विश्‍वचषक 2022:सामन्यागणिक नव्या डावपेचाने चॅम्पियन झाला अर्जेंटिना

दाेहा/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार खेळाडू लियाेनेल मेसीचे कुशल नेतृत्व आणि प्रशिक्षक लियाेनेल स्कालाेनी यांच्या अनमाेल मार्गदर्शनाखाली अर्जेंटिना संघाने ३६ वर्षांनंतर फुटबाॅलच्या विश्वात जगज्जेता हाेण्याचा बहुमान पटकावला. अर्जेंटिना संघाने फायनलमध्ये रविवारी किलियन एमबापेच्या गतविजेत्या फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिना संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने राेमहर्षक विजय साजरा केला. यासह अर्जेंटिना संघाला करिअरमध्ये तिसऱ्यांदा वि‌श्वविजेता हाेण्याचा पराक्रम गाजवता आला. अर्जेंटिना संघाने सामन्यागणिक नव्या डावपेचांसह मैदानावर उतरत किताबाचा पल्ला यशस्वीपणे गाठला. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांना अर्जेंटिनाला राेखण्यासाठीचा अचूक असा अंदाजच बांधता आला नाही. प्रशिक्षक स्कालाेनी यांनी सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघ पाहून खास डावपेच आखले. यातूनच टीमला जेतेपदावर नाव काेरता आले. यासाठी स्कालाेनी सामन्यागणिक प्लॅन-ए, बी आणि सीदेखील तयार ठेवत हाेते. अर्जेंटिना संघाला सलामीला आशिया खंडातील साैदी अरेबिया टीमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सलामीला अर्जेंटिना संघ ४-४-२ फाॅर्मेशनसह मैदानावर उतरला हाेता. मात्र, यादरम्यान संघाचे डावपेच अपयशी ठरले. मात्र, त्यानंतर लगेच प्रशिक्षक स्कालाेनी यांनी आपल्या फाॅर्मेशनमध्ये बदल केला.

अमेरिकेत २०२६ चा विश्वचषक :
आता २०२६ विश्वचषक फुटबाॅल स्पर्धा संयुक्तपणे तीन देशांमध्ये हाेणार आहे. यासाठी अमेरिका, मेक्सिकाे आणि कॅनडाला संयुक्तपणे यजमानपद जाहीर झाले. यासाठी ९० हजार काेटींचा खर्च करण्यात येणार आहे.

अर्जेंटिनाच्या विश्वविजेतेपदाचा आनंदाेत्सव काेल्हापूरसह देशभरात जल्लाेष
लियाेनेल मेसीच्या अर्जेंटिना संघाने िफफा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. याच अर्जेंटिना संघाच्या विश्वविजेतेपदाचा आनंदाेत्सव जगभरासह महाराष्ट्रातील काेल्हापुरात माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यातून देशभरातही माेठ्या उत्साहात हा आनंद साजरा करण्यात आला.

फाॅर्मेशनमध्ये बदल करणारे एकमेव काेच ठरले स्कालाेनी
सामन्यागणिक व प्रतिस्पर्धी संघ पाहून फाॅर्मेशनमध्ये बदल करणारे स्कालाेनी हे एकमेव प्रशिक्षक ठरले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याची सुरुवात ५-३-२ फॉर्मेशनने केली. मात्र, संघाला पहिल्या हाफमध्ये अपेक्षित खेळी करता आली नाही. त्यांनी मध्यंतरानंतर लगेच फार्मेशनमध्ये बदल केला. संघ ४-४-२ फाॅर्मेशनने मैदानावर खेळू लागला. त्यांनी खेळाडूंच्या पाेझिशनमध्ये बदल केला. मारिया सुरुवातीला राइट विंगकडून खेळला. मात्र, ताे फ्रान्सविरुद्ध फायनलमध्ये लेफ्ट विंगमध्ये खेळला.

बातम्या आणखी आहेत...