आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Argentina Champions, Beaten By France In Penalty Shootout, Out Of European Cup After 20 Years

सर्वात रोमहर्षक फायनल:अर्जेंटिना चॅम्पियन, पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव, 20 वर्षांनंतर चषक युरोपबाहेर

दोहाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता बनला आहे. गतविजेत्या फ्रान्सला ३-३ च्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवत ३६ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन ठरला. अर्जेंटिनाच्या मेसीने पेनल्टीवर पहिला गोल केला. दुसरा एंजेल डी मारियाने केला. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये किलियन एमबापेने ९७ सेकंदांत २ गोल केले. सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला. पहिल्या १५ मिनिटांत एकही गोल झाला नाही, पण पुढच्या १५ मिनिटांत मेसीने गोल करत अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. मग एमबापेने पेनल्टीवर गोल करत सामना ३-३ ने बरोबरीवर आणला. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिना जिंकला. अशा प्रकारे फुटबॉलमधील युरोपची जादूही २० वर्षांनंतर ओसरली. चषक युरोपच्या बाहेर गेला.

सद्दी मेसीची, पण भविष्य एमबापेचे
३५ वर्षीय मेसीने करिअरमध्ये सर्वात मोठी ट्रॉफी जिंकली. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून तो वरचढ राहिला. आता तो निवृत्ती घेत आहे. दुसरीकडे, केवळ २ वर्ल्डकपमध्ये १२ गोल करणारा एमबापे सध्या २४ वर्षंाचा होणार असल्याने किमान ३ वर्ल्डकप खेळू शकतो. हा वेग राहिल्यास सर्वात यशस्वी खेळाडू बनू शकतो.

मात्र जगाची ४% लोकसंख्याच बादशहा
आजवर २२ वर्ल्डकपमध्ये १२ वेळा युरोपचे ५ देश जिंकले. जर्मनी(४ वेळा), इटली (४), फ्रान्स (२), इंग्लंड (१), स्पेन (१). या देशांत एकूण ३४ कोटी लोकसंख्या आहे, जी जगाच्या ७७० कोटींच्या ४% आहे. दक्षिण अमेरिकी देश एकूण १० वेळा विजेते झाले. ब्राझील(५ वेळा), अर्जेंटिना (३ वेळा), उरुग्वे (२ वेळा). या दृष्टीने ब्राझील सर्वात जास्त चॅम्पियन ठरला. मात्र २००२ नंतर यश नाही.

गोल्डन बॉल
लियोनेल मेसी अर्जेंटिनाला करिअरचा पहिला वर्ल्डकप मिळवून दिला. स्पर्धेत ७ गोल केले.

गोल्डन बूट
किलियन एमबापे फायनलमध्ये हॅट््ट्रिकसह स्पर्धेमध्ये ८ गोल केले.

गोल्डन ग्लोव्ह्ज
एमी मार्टिनेज, बेस्ट गोलकीपर, पेनल्टी शूटमध्ये फ्रान्स संघाला ४-२ वर रोखले.

यंग प्लेयर अवॉर्ड
एन्जो फर्नांडेज अंडर-२१ बेस्ट फुटबॉलपटू, सर्व सामन्यांत तुफानी खेळ.

बातम्या आणखी आहेत...