आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसीचा आंतरराष्ट्रीय करिअरमधून संन्यास:अर्जेंटिनाचा फुटबॉल लिजेंड मेसीची वर्ल्डकपनंतर निवृत्ती

ब्यूनॉस आयर्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुटबॉल लिजेंड लियोनेल मेसी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय करिअरमधून संन्यास घेऊ शकतो. ३५ वर्षांचा मेसी १८ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळत आहे. कतारमध्ये या वर्षी होणारा फिफा वर्ल्डकप त्याचा पाचवा वर्ल्डकप असेल. त्याने सांगितले की, हा माझा अखेरचा वर्ल्डकप असेल हे निश्चित आहे. या वक्तव्यानंतर त्याच्या निवृत्तीची शक्यता व्यक्त होत आहे. त्याने अर्जेंटिनासाठी एकूण १६४ सामने खेळले आहेत. ९० गोल केले आहेत. सर्वात जास्त गोल करण्याच्या बाबतीत तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापेक्षा जास्त गोल पोर्तुगालच्या क्रिस्टियानो रोनाल्डो (१८९ सामने ११७ गोल) आणि इराणच्या अली दाएईने (१४८ सामने, १०९ गोल) केले आहेत. मेसी म्हणाला, अर्जेंटिनाला केवळ सर्वात मोठा चषक (कोपा अमेरिका) जिंकून देऊ शकलो. वर्ल्डकप जिंकून देऊ शकलो नाही ही मेसीची खंत राहील.

बातम्या आणखी आहेत...