आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबाॅलच्या विश्वातील जगज्जेता संघ रविवारी लुसैल स्टेडियमवर निश्चित हाेणार आहे. हीच विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी अर्जेंटिना आणि फ्रान्स संघ आज रविवारी फायनलमध्ये झंुज देणार आहेत. दाेन वेळचे विश्वविजेते हे दाेन्ही संघ तिसऱ्या जेतेपदासाठी झुंजणार आहेत. तसेच फ्रान्स संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्यासाठी उत्सुक आहे.
अँटाेनी ग्रीजमॅनवर फ्रान्सच्या विजयाची मदार
फ्रान्स: अँटाेनी ग्रीजमॅन सध्या चांगली खेळी करत संघाच्या विजयासाठी माेलाचे याेगदान देत आहे. त्याने संघाला गाेल करण्यासाठी सर्वाधिक २१ वेळा संधी मिळवून दिल्या. त्याने ३ असिस्टही केले आहेत. आक्रमक खेळीची मदार ही ग्रीजमॅनवर असेल. एमबापे व जिरू यांच्यात गाेल्डन बुटसाठी चुरस आहे.
अर्जेंटिनाच्या २२ वर्षीय अल्वारेजचे ४ गाेल नाेंद
अर्जेंटिना: ज्युलियन अल्वारेज सध्या फाॅर्मात आहे. त्याच्या नावे यंदा ४ गाेलची नाेंद आहे. अल्वारेज हा अर्जेंटिनाच्या इतिहासात वयाच्या २२ व्या वर्षात वर्ल्डकपमध्ये चार गाेल करणारा दुसरा फुटबाॅलपटू ठरला. त्याला सुरुवातीच्या सामन्यादरम्यान संधी मिळाली नव्हती. त्यानंतर प्रत्येक संधीला सार्थकी लावत त्याने संघाच्या विजयात याेगदान दिले.
स्ट्रॅटेजी कॉर्नर
विश्वचषकात ३६४० काेटींची बक्षिसे; १० टक्के चॅम्पियनला
यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेमध्ये अर्जेंटिना किंवा फ्रान्स या दाेन्हीपैकी एक संघ ३४८ काेटी रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे. फिफाच्या वतीने विश्वचषकासाठी ३ हजार ६४० काेटींच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाताे. यातील १० टक्के रक्कम ही चॅम्पियन संघाला मिळते. उपविजेता संघ २४८ काेटींचा मानकरी ठरताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.