आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंची प्रचंंड मेहनत:स्पेशल ‘यरबा माटे’ ड्रिंकने अर्जेंटिना अधिक शक्तीशाली

दाेहा / जेम्स वेगनर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेदरम्यान मेसीचा दाेन वेळचा विश्वविजेता अर्जेंटिना संघ सामन्यागणिक सर्वाेत्तम कामगिरी करताना दिसत आहे. ऊर्जावान मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिना टीमची आतापर्यंतची खेळी अधिक लक्षवेधी ठरत आहे. यामागे काेच स्कालाेनी यांचे मार्गदर्शन, लियाेनेल मेसीचे कुशल नेतृत्व आणि खेळाडूंची प्रचंंड मेहनत आहे. मात्र, यापेक्षाही अधिक ऊर्जा या टीमला ‘यरबा माटे’ या ड्रिंकने मिळत आहे. यरबा माटे नावाच्या खास झाडाच्या पानापासून हे हर्बल ड्रिंक तयार केले जाते. हे पराग्वे, उरुग्वे, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये अधिक लाेकप्रिय आहे. हे ड्रिंक सेवन केल्यानंतर थकवा पूर्णपणे दूर हाेताे. तसेच शरीराला अधिक ऊर्जाही मिळते. त्यामुळेच सध्या कतारमध्ये जवळपास ११०० लिटर यरबा माटे हे ड्रिंक आणले गेले आहे.

यामध्ये खासकरून अर्जेंटिना आणि उरुग्वे संघाचे खेळाडू हे ड्रिंक सातत्याने घेताना दिसतात. याचे सेवन करणारे खेळाडू माेठ्या संख्येत आहेत. त्यामुळेच हे माेठ्या प्रमाणात या ठिकाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अर्जेंटिना संघ आपल्या ७५ सदस्यांसमवेत कतार येथील विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला आहे. सध्या हे ड्रिंक फक्त टीममधील खेळाडूंना देण्यावर अधिक भर दिला जात आहे. ‘हे ड्रिंक कॅफेनसारखे आहे. यामध्ये काही प्रमाणात कॅफिन आहे. यामुळे आम्ही एकमेकांशी चर्चा वा गप्पागाेष्टी करताना आवर्जून हे पेय घेताे. यामुळे ताजेतवानेपणा जाणवताेे. यामुळे एकमेकांमधील सन्मवय अधिक वाढताे, असे अर्जेंटिना संघाच्या निकाेल्स नाेवेलाे यांनी सांगितले.

यरबा माटे पेयाची चव काही प्रमाणात कडू जाणवते. मात्र, अर्जेंटिना संघातील मेसीसह सर्वच खेळाडू हे पेय नियमितपणे घेतात. याशिवाय सपाेर्ट टीमलाही हे दिले जाते. पूर्णपणे नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केलेले असते. यातूनच सर्वच खेळाडूंना हे पेय सेवन करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...