आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुटबॉल विश्वचषकाची सफर आता अंतिम टप्प्यात आहे. १३ डिसेंबरला रात्री १२.३० वाजता अर्जेंटिना-क्रोएिशया, तर १४ डिसेंबरच्या रात्री फ्रान्स-मोरोक्को उपांत्य फेरीत लढतील. १८ डिसेंबरला अंतिम सामना होईल. प्रथमच गतविजेता (फ्रान्स) व गतउपविजेता (क्रोएशिया) संघांचा उपांत्य फेरीत मुकाबला हाेईल. कमकुवत समजल्या जाणाऱ्या मोरोक्कोविरुद्ध एकही संघ गोल करू शकला नाही. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच खेळाडूकडून एक गोल झाला होता. क्रोएशियाही अद्याप हरलेला नाही. त्यामुळे फ्रान्स, अर्जेंटिनाचा मार्ग खडतर आहे.
आतापर्यंत ... २४ दिवस, ६० सामने, १५९ गोल, ११३ असिस्ट, १४२ यलाे, ४ रेड कार्ड
20 नोव्हेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेस प्रारंभ झाला. २४ दिवस झाले असून एकूण ३२ संघांमध्ये ६० सामने झाले. आता ४ संघ रिंगणात उरले.
सर्वाधिक गोल ; स्पर्धेत आतापर्यंत १५९ गोल झाले.सर्वाधिक १३ इंग्लंडचे आहेत. सर्वाधिक गोल फरक; स्पेनने कोस्टारिकाला ७-० ने हरवले, हा सर्वात मोठा विजय ठरला.
सर्वाधिक बॉल टच; स्पेनच्या रोड्रीचे ७१०, क्रोएशियाच्या मार्शेलोने ५३९ वेळा टच केला.
सर्वाधिक यलो कार्ड; स्पर्धेत एकूण १४२ दाखवले. २२ खेळाडूंना २-२ वेळा मिळाले.
अद्याप बाकी... गोल्डन बूटचे दावेदार एमबापे अन् संघांमध्ये अर्जेंटिना-फ्रान्स
गोल्डन बूटमध्ये कोण कुठे
खेळाडू गोल देश
एमबापे ५ फ्रान्स
जिरू ४ फ्रान्स
मेसी ४ अर्जेंटिना
विजयाचे अंदाज
अर्जेंटिना क्राेएिशया ६१% ३९%
फ्रान्स मोरक्को ६८% ३२%
आर्टिफिशियल इंटेलिजन्स विश्लेषणावर आधारित
धक्कादायक निकाल ; स्पर्धा सुरू झाली तेव्हा ब्राझील ४०% सह उपांत्यफेरीचा दावेदार होता. परंतु तो बाहेर गेला. मोरक्कोला टॉप-१६ संघात स्थान मिळण्याची आशा नव्हती, तो उपांत्य फेरीत खेळतोय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.