आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Argentina Won 3 2; Indian Women's Team Loses, Pro Hockey League; Record India's Sixth Defeat

हॉकी:अर्जेंटिना 3-2 ने  विजयी; भारतीय महिला संघाचा पराभव, प्रो हॉकी लीग; भारताचा सहावा पराभव नोंद

रॉटरडॅम7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जेंटिना संघाने गत सामन्यातील पराभवाचा वचपा काढताना दुसऱ्या लढतीत रविवारी भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव केला. अर्जेंटिना टीमने प्रो हॉकी लीगच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर मात केली. अर्जेंटिना संघाने ३-२ ने सामना जिंकला.

डेल्फिना थाेमे (३७ वा मि.), युजेनिया ट्रिनचिनेटी (४० वा मि.) आणि अगस्टिना (४२ वा मि.) यांनी गोल करून अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला. भारताकडून सलामी टेटे (२२ वा मि.) आणि दीप ग्रेसने (४७ वा मि.) प्रत्येकी एक गोल केला. गत सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार विजय संपादन केला हाेता. याच पराभवाची परतफेड जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेंटिना संघाने केली.

भारतीय संघाला लीगमध्ये सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघ २४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच फाॅर्मात असलेल्या अर्जेटिना महिला संघाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...