आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Argentina's Players Are Now 'weighty' After Best Performance In World Cup

एंजाेला 700 काेटींची ऑफर; लिव्हरपूल बेलिंगहॅमसाठी 800 काेटी माेजणार!:विश्वचषकातील सर्वाेत्तम कामगिरीने अर्जेंटिना संघाचे खेळाडू आता ‘वजनदार’

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये नुकत्याच झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिना संघापाठाेपाठ अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली. त्यामुळे आता सर्वाेत्तम खेळीमुळे या स्टार खेळाडंूचे फुटबाॅलच्या विश्वातील वजन वाढले आहे. त्यांना आगामी लीगसाठी प्रचंड मागणी असणार आहे. विश्वविजेत्या अर्जँटिनाच्या एंजाेला ७०० काेटी रुपयांची ऑफर आहे. बेलिंगहॅमसाठी लिव्हरपूलने ८०० काेटी रुपये माेजण्याची तयारी दर्शवली. 1. अज्जेडिन, वय : 22 वर्षे, देश : मोराेक्को, पाेझिशन : मिडफील्डर विश्वचषकात माेराेक्काेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशात अज्जेडिन आैनाहीचेही माेलाचे याेगदान ठरले. मिडफील्डरच्या भूमिकेतील त्याची खेळी लक्षवेधी ठरली. त्यामुळे आता त्याच्यावर प्रीमियर लीगसाठी लिस्टर सिटी क्लबची करारासाठीची नजर आहे. यातूनच ताे माेठ्या रकमेत सिटीसाेबत करारबद्ध हाेऊ शकेल.

2. जुड बेलिंगहॅम, वय : 19 वर्षे, देश: इंग्लंड , पाेझिशन : मिडफील्डर जुडला करारबद्ध करण्याठी रिअल माद्रिद आणि लिव्हरपूल क्लब आघाडीवर आहेत. लिव्हरपूलने यासाठी चक्क ८७९ काेटी रुपये माेजण्यास तयार आहे. तसेच बाेरुसिया डाॅर्टमंडने बेलिंगहॅमसाेबत २०२५ पर्यंत करार केलेला आहे. आता हा ब्रेक करण्यासाठी बेलिंगहॅमला १३१९ काेटी रुपये माेजावे लागतील.

3. कोडी गाक्पो, वय: 23 वर्षे, देश : हाॅलंड, पाेझिशन : फॉरवर्ड राेनाल्डाेने साेडचिठ्ठी दिल्यानंतर मँचेस्टर युनायटेडने काेडी गाक्पाे या युवा खेळाडूला आपल्यासाेबत करारबद्ध केले. पाच सामन्यांत ३ गाेल करणाऱ्या या युवा खेळाडूवर युनायटेड क्लब ४३९ काेटींची बाेली लावण्यास तयार आहे. फाॅरवर्डच्या भूमिकेत आम्ही गाक्पाेला क्लबमध्ये सहभागी करत आहाेत, अशी प्रतिक्रिया मॅनेजर टेन हँग यांनी दिली.

4. एंजाे फर्नांडिस, वय: 21 वर्षे, देश: अर्जेंटिना, पाेझिशन : मिडफील्डर विश्वचषकातील यंग प्लेअर ऑफ द टुर्नांमेटचा मानकरी एंजाे फर्नांडिझ सध्या अधिकच चर्चेत आहे. या २१ वर्षीय खेळाडूला आपल्यासाेबत करारबद्धसाठी लिव्हरपूल, चेल्सीसह काही क्लबमध्ये चुरस रंगत आहे. सध्या एंजाे हा बेनफिका क्लबसाेबत करारबद्ध आहे. नव्या करारसाठी त्याला बेनफिकाला १०५५ काेटी रुपये द्यावे लागणार आहेत.

5. एलिस्टर, वय : 23 वर्षे, देश : अर्जेंटिना, पाेझिशन : मिडफील्डर एलिस्टरनेही विश्वचषकातील सर्वाेत्तम खेळीतून क्लबचे लक्षवेधून घेतले. त्यामुळे टाॅटेनहॅम, अॅथलेटिकाे माद्रिद, युवेंटस आणि इंटर मिलानसारखे क्लब त्याला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याला नव्या करारातून आपल्या जुन्या क्लबला २६३ काेटी रुपये द्यावे लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...